नगर पालिकेच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST2020-12-27T04:12:57+5:302020-12-27T04:12:57+5:30

पाथरी- मानवत रस्त्यावर असलेल्या फिल्टर मैदानावर होणाऱ्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये, दुसरे पारितोषिक ११ हजार रुपये आणि ...

Organizing cricket tournament on behalf of the municipality | नगर पालिकेच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

नगर पालिकेच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पाथरी- मानवत रस्त्यावर असलेल्या फिल्टर मैदानावर होणाऱ्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये, दुसरे पारितोषिक ११ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये विजेत्या संघाना मिळणार आहे. प्रत्येक सामना ८ षटकाचा असणार आहे.जास्तीत संघानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी जयंत सोनवणे, नगराध्यक्ष एस. एन. पाटील, उपाध्यक्ष राणी अंकुश लाड यांनी केले आहे.

समीर वाळके कृषी आयुक्ताकडुन सन्मानित

सोनपेठः येथील कृषी मंडळ अधिकारी समीर वाळके यांना कृषी आयुक्ताकडुन सन्मानित करण्यात आले.सोनपेठ तालुक्यात कृषी मंडळ अधिकारी म्हणुन त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल कृषी आयुक्त धिरज कुमार यांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तालुक्यातील प्रत्येक गावाचा शेतशिवारात वाळके यांनी शासनाच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत त्यांना सखोल मार्गदर्शन केले.

Web Title: Organizing cricket tournament on behalf of the municipality