नव्या रुग्णांची संख्या १९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST2021-07-01T04:14:06+5:302021-07-01T04:14:06+5:30

परभणी : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, बुधवारी नवीन १९ रुग्णांची नोंद झाली आहे तर एका रुग्णाचा ...

The number of new patients is 19 | नव्या रुग्णांची संख्या १९ वर

नव्या रुग्णांची संख्या १९ वर

परभणी : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, बुधवारी नवीन १९ रुग्णांची नोंद झाली आहे तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग लक्षणीयरीत्या घटला आहे. मागील दोन-तीन आठवड्यापासून ही संख्या कमी होत आहे. ३० जून रोजी जिल्हा प्रशासनाला १ हजार ८६१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ६३७ अहवालांमध्ये १५ आणि रॅपिड टेस्टच्या १२४ अहवालांमध्ये चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० हजार ९१० झाली असून, ४९ हजार ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २८३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या २८२ रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसभरात १२ रुग्णांना सुटी झाली.

Web Title: The number of new patients is 19