परभणी शहरातील वसमत रस्त्यावर युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST2021-08-23T04:21:16+5:302021-08-23T04:21:16+5:30

यासंदर्भात माहिती अशी, वसमत रस्त्यावरील चौपाल सागर मॉलच्या जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली आहे. ...

Murder of a youth on Wasmat Road in Parbhani | परभणी शहरातील वसमत रस्त्यावर युवकाचा खून

परभणी शहरातील वसमत रस्त्यावर युवकाचा खून

यासंदर्भात माहिती अशी, वसमत रस्त्यावरील चौपाल सागर मॉलच्या जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली आहे. पुष्कर संतोष बोधनकर (२४) असे मयत युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली. पुष्कर बोधनकर यास आरोपींनी २१ ऑगस्ट रोजी रात्री फोन करून बोलावून घेतले होते. घटनास्थळी झालेल्या वादातून तीक्ष्ण हत्याराने वार करून पुष्कर बोधनकर या युवकाचा खून करण्यात आला. दरम्यान खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी शनिवारी रात्री घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. वसमत रस्त्यावरील हे घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंद झाला नसल्याने खुनाचे नेमके कारण काय आहे, हे समजू शकले नाही.

Web Title: Murder of a youth on Wasmat Road in Parbhani