शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यानंतर बाजारपेठ खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

परभणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ २ जूनरोजी सुरू करण्यात आली. सकाळपासूनच खरेदीसाठी ग्राहक मोठ्या ...

परभणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ २ जूनरोजी सुरू करण्यात आली. सकाळपासूनच खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये दाखल झाल्याने एकच गर्दी झाली होती.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण नोंद होत असल्याने प्रशासनाने २४ मार्चरोजी आदेश काढून प्रथमच दिवसाची संचारबंदी लागू केली. त्यानंतर प्रत्येकवेळी या संचारबंदीत वाढ करण्यात आली. तब्बल दोन महिने जिल्ह्यातील बाजारपेठ ठप्प होती. मध्यंतरीच्या काळात आवश्यक सेवेत मोडणारे किराणा आणि फळे, भाजी विक्रीच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत सवलत दिली होती. ही दुकाने वगळता जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्णतः ठप्प होती. सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ३१ मे रोजी जिल्हा प्रशासनाने केवळ किराणा आणि भाजी विक्रीच्या दुकानांनाच परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर २ ते ४ जूनपर्यंत बाजारपेठ खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रशासनाच्या निर्णयानुसार बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठेतील दुकाने सुरू झाली. किराणा, भाजी विक्रीसह रेडिमेड कापड, इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्यप्रसाधने, झेरॉक्स सेंटर, कटिंग सलून, पुस्तकांची दुकाने यासह जिल्ह्यातील किरकोळ व्यावसायिकांनीही दुकाने दुकाने सुरू केली. बाजारपेठ सुरू झाल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प पडल्याने व्यापारी अडचणीत होते. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व्यापाऱ्यांनीही उत्साहाने दुकाने सुरू केली.

नागरिकांचीही अत्यावश्यक सेवेतील व इतर सर्व कामे ठप्प होती. त्यामुळे नागरिकही मोठ्या संख्येने बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले. कापड मार्केट, सराफा मार्केट यासह इलेक्‍ट्रॉनिक्‍स बाजारपेठेतही बुधवारी ग्राहकांची गर्दी दिसून आली. शहरातील शिवाजी चौक, कच्छी बाजार, जनता मार्केट, नानलपेठ, गांधी पार्क, क्रांती चौक, गुजरी बाजार, अष्टभुजा देवी मंदिर परिसर, नारायण चाळ, नवा मोंढा, ग्रँड कॉर्नर या परिसरात दुपारपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करून होते. एकंदर बाजारपेठ सुरू झाल्याने व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

जागोजागी वाहतूक ठप्प

तब्बल दोन महिन्यानंतर संपूर्ण बाजारपेठ खुली झाल्याने नागरिकांनीही प्रतिसाद देत खरेदीसाठी बाजारपेठ गाठली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दोन महिन्यानंतर जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून आले. जनता मार्केट, शिवाजी चौक, नानलपेठ, गांधी पार्क, गव्हाणे चौक आदी परिसरात अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. विशेष म्हणजे, संचारबंदी काळात एकेरी वाहतुकीचे नियम गुंडाळून ठेवले होते. आजही एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक झाल्याने दिवसभर शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.