शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त सोन्याचे आमिष महागात पडले; मुंबईच्या महिलेस सेलूत बोलावून ८ लाखाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 17:04 IST

Crime News सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावरील एका शेतात नेऊन मारहाण करत लुटले

ठळक मुद्देकमी भावात सोने देतो म्हणून मुंबई येथील महिलेची फसवणूकखात्री पटावी म्हणून पहिल्या वेळेस खरे सोने देत व्यवहार पूर्ण केला

सेलू :  कमी भावात सोने देतो म्हणून मुंबई येथील एका डाॅक्टर महिलेला सेलू येथे बोलावून मारहाण करून ८ लाख रुपये लुटल्याची घटना  डिग्रस बरसाले शिवारात उघडकीस आली आहे. शुक्रवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून सेलू पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई येथे डॉ. उज्वला संदीप बोराडे यांचा मालाड येथे दवाखाना आहे. त्यांच्याकडे सुनिता ( पूर्ण नाव माहित नाही) ही महिला पेंशन्ट म्हणून अडीच वर्षापासून येत होती. १ महिन्यांपूर्वी डॉ. उज्वला यांना सुनिताने  फोन करून आम्हाला गावाकडील शेतात १ किलो सोने सापडले आहे. तुम्हाला ३० हजार रुपये तोळा प्रमाणे देतो असे सांगितले. त्यानंतर डॉ. उज्वला या पती,  काका यांना घेऊन वाहनाने सोने खरेदी करण्यासाठी सेलू येथे शुक्रवारी आल्या. त्यांना सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावरील एका शेतात सोनेचा व्यवहार करण्यासाठी नेले. येथे सुनिता आणि तिच्या सात साथीदारांनी डॉ. उज्वला आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. व्यवहारासाठी आणलेले ८ लाख रुपये रोख आणि मोबाईल फोन घेऊन ते सर्वजण फरार झाले. याप्रकरणी सेलू पोलिसात डॉ. उज्वला संदीप बोराडे यांच्या फिर्यादीवरून सुनीतासह अज्ञात ७ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर करत आहेत.

यापूर्वी झाला होता सोन्याचा व्यवहार सुनिता हीने यापूर्वी डॉ. उज्वला यांना सेलू येथे बोलावून ३० हजार रुपयात दोन सोन्याचे गिण्णी व अंगठी दिले होते.  त्यांनी मुंबईत सोने खरे आहे की खोटे याची पडताळणी केली असता दिलेले सोने खरे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पुढील व्यवहारासाठी त्यांनी ८ लाख रुपये  आणले. मात्र आरोपींनी डाव साधत मारहाण करत रक्कम लुटली. दरम्यान, कमी भावात सोने घेण्याची हव्यास त्यांना महागात पडला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीGoldसोनं