लालपरीत पुन्हा खटखट; तिकीट मशीन दुरुस्त करायला एसटीकडे पैसा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:18 AM2021-07-28T04:18:43+5:302021-07-28T04:18:43+5:30

परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार व हिंगोली जिल्ह्यातील तीन अशा एकूण ७ आगारांचा समावेश आहे. या ...

Knock again in red; ST has no money to repair ticket machines! | लालपरीत पुन्हा खटखट; तिकीट मशीन दुरुस्त करायला एसटीकडे पैसा नाही!

लालपरीत पुन्हा खटखट; तिकीट मशीन दुरुस्त करायला एसटीकडे पैसा नाही!

Next

परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार व हिंगोली जिल्ह्यातील तीन अशा एकूण ७ आगारांचा समावेश आहे. या आगारांकडे ८४८ इलेक्ट्रॉनिक मशीन देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत त्यातील केवळ ३३० मशीन सुरू असून, ५१८ मशीन बंद अवस्थेत आहेत.

वाहकांची पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव

कोरोना विषाणूच्या महामारीत बंद करण्यात आलेल्या एस.टी. बसेस १ जुलैपासून जिल्ह्यातील रस्त्यांवरून धावत आहेत. मात्र बहुतांश वाहकांकडे ईटीआय मशीन दिसून येत नाहीत. त्यामुळे जुन्याच पद्धतीने प्रवाशांची तिकिटे फाडून वाहकांना आकड्यांची जुळवाजुळव करून बऱ्याच दिवसांनी हिशोब करण्याची वेळ आल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.

दुष्काळात तेरावा...

महिनाभरापासून एस.टी. महामंडळाची लालपरी रस्त्यावरून धावत असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. तर दुसरीकडे या मशीन बंद पडल्याने महामंडळासमोर दुष्काळात तेरावा महिना आला आहे.

पगार मिळतोय हेच नशीब

इलेक्ट्रॉनिक मशीन दुरुस्तीसाठी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र या मशीन दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने त्या धूळखात पडलेल्या आहेत. तूर्त चालक व वाहकांचे पगार वेळेवर मिळतात, हेच नशीब असल्याचे अनेकांनी सांगितले.

Web Title: Knock again in red; ST has no money to repair ticket machines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.