शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

लेकरांना काचेत ठेवा, पण सुखात ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST

पालम : आमचं काहीही बरेवाईट होऊ द्या, आमच्या लेकरांना काचात राहू द्या, पण त्यांना सुखात ठेवा, असे भावनिक उद्गार ...

पालम : आमचं काहीही बरेवाईट होऊ द्या, आमच्या लेकरांना काचात राहू द्या, पण त्यांना सुखात ठेवा, असे भावनिक उद्गार शुद्धीवर आलेल्या माता-पित्यांनी काढताच नातेवाइकांचे डोळे पाणावले.

तालुक्यातील आडगाव येथे वाळविलेल्या हळदीला कीड लागू नये म्हणून हळदींच्या पोत्यात टाकलेल्या कीडनाशकाचा वायू तयार होऊन गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना २४ जुलै रोजी घडली. याच प्रकरणातील गंभीर असलेल्या या दोन बालकांच्या आई-वडिलांवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. आडगाव येथील कुगणे कुटुंबासाठी २४ जुलैची रात्र काळरात्र ठरली. हळदीच्या पोत्यात कीड लागू नये, यासाठी ठेवलेल्या विषारी गोळ्यांनी कुगणे परिवाराला उद्‌ध्वस्त केले आहे. नांदेड येथे उपचार घेताना २४ जुलै दुपारी १ वाजता महादेवी कुगणे (वय २) व कन्हैया कुगणे (वय ४ वर्षे) या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईवडिलांच्या माघारीच नातेवाइकांनी आडगाव येथे त्यांचा अंत्यविधी केला. दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थ व नातेवाइकांनी गंभीर अवस्थेत उपचार घेत असलेल्या ज्योती भीमाशंकर कुगणे (२५) व भीमाशंकर सदानंद कुगणे (२९) या माता-पित्यांना दिली नव्हती.

२५ जुलै रोजी दोघेही माता-पिता शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर लगेच त्यांनी आमची लेकरं कशी आहेत? याची विचारणा केली. दोन्ही मुलं दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी काचात ठेवलीत? अशी समजूत नातेवाइकांनी काढली. कुगणे दाम्पत्याची प्रकृती गंभीर असल्याने व त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांना मानसिक धक्का बसू नये, या उद्देशाने नातेवाइकांनी मुलांच्या मृत्यूची माहिती दिली नाही. मात्र ही माहिती दिल्यानंतर आमच्या लेकरांना सुखात ठेवा, उपचारासाठी वेळ लागू द्या, आमचं काही बरंवाईट होऊ द्या, असे म्हणत या दाम्पत्याने अश्रूंना वाट वाट मोकळी करून दिली. हा प्रसंग पाहून उपस्थित असलेले सर्वच नातेवाइकांचे डोळे पाणावले. दरम्यान, ही दु:खद घटना कुगणे दाम्पत्यास कशी सांगावी? याच चिंतेने नातेवाईक बुचकळ्यात पडले आहेत.