शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर मराठवाड्यासाठी केवळ चारच रेल्वे गाड्या असल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:14 IST

राज्य शासनाने राज्यात रेल्वे वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी आशा होती.

ठळक मुद्देमराठवाडा एक्स्प्रेसची मागणी जोर धरु लागली२०० कि.मी.च्या निर्णयाचा फटका

परभणी :  अनलॉकच्या प्रक्रियेनंतर दिवाळी सणासाठी सुरू केलेली नांदेड- पनवेल ही विशेष रेल्वेगाडीही बंद केली जाणार असून, केवळ तीन ते चार रेल्वे गाड्याच मराठवाड्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

राज्य शासनाने राज्यात रेल्वे वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी आशा होती. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड- पनवेल ही रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे काही दिवस मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वेसेवाही चालविण्यात आली.  मात्र मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तर पनवेल एक्स्प्रेस २९ तारखेपर्यंतच धावणार आहे.  त्यानंतर मात्र दिल्लीसाठी सचखंड एक्स्प्रेस, मुंबईसाठी नंदीग्राम एक्स्प्रेस आणि हैदराबादसाठी परभणी - हैदराबाद व औरंगाबाद- हैदराबाद या चारच रेल्वे गाड्या धावत आहेत.

या चारही गाड्यांना बहुतांश वेळा आरक्षण फुल्ल झालेले असते. त्यामुळे नांदेड, परभणी या स्थानकावरुन औरंगाबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण मिळत नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद, मनमाडपर्यंतच मराठवाड्यातून सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. मात्र अद्याप या सेवेला हिरवा झेंडा मिळाला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

२०० कि.मी.च्या निर्णयाचा फटकारेल्वे विभागाने २०० कि.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्याच रेल्वे गाड्या सुरू करण्याचे धोरण ठरविले आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना मराठवाड्यातील गावे गाठण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधेचाच वापर करावा लागत आहे.  मराठवाड्यातून औरंगाबाद येथे विविध कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्व सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आहे.  ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाtourismपर्यटन