नाल्यातील पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST2021-07-14T04:21:09+5:302021-07-14T04:21:09+5:30

शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सहारा कॉलनी भागातील काही घरांमध्ये नालीचे पाणी व पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. यामुळे ...

Inconvenience due to infiltration of water from nala in many houses | नाल्यातील पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने गैरसोय

नाल्यातील पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने गैरसोय

शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सहारा कॉलनी भागातील काही घरांमध्ये नालीचे पाणी व पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. यामुळे अनेक नागरिकांना शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरी स्थलांतर करावे लागले. मात्र यासाठी मनपा तसेच लोकप्रतिनिधींच्या वतीने कोणतीही मदत देण्यात आली नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. सहारा कॉलनी परिसरात ८ ते १० घरांमध्ये हे पाणी शिरले होते. यातच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने घरातील साचलेले पाणी काढण्यासाठी गैरसोय झाली. काही घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मनपा प्रशासनाने या भागात नाली बांधकाम करून सांडपाणी जाण्यासाठी जागा मोकळी करून द्यावी, अशी मागणी लक्ष्मण काळे, अविनाश पवार, नेताजी देशमुख, विशाल गायकवाड, विश्वनाथ इंगोले, अरुण साखरे, मधुकर वानखेडे, अशोक बोचरे, तुळशीराम वझीर, शरद सुपेकर, महादू लिंगायत आदींनी मनपा आयुक्तांकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.

Web Title: Inconvenience due to infiltration of water from nala in many houses