शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक : दोन टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST

शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी २५ मे रोजी गस्तीवर असताना दुपारी १ च्या सुमारास कल्याण मंडपम्‌समोरील रोडवर एमएच ...

शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी २५ मे रोजी गस्तीवर असताना दुपारी १ च्या सुमारास कल्याण मंडपम्‌समोरील रोडवर एमएच ०४ डीके ९५८८ क्रमांकाचा टिप्पर भरघाव वेगाने जाताना त्यांना दिसला. या वाहनाचा पाठलाग करून त्यास थांबविले असता त्यामध्ये १ ब्रास चोरटी वाळू आढळून आली. सदरील वाहन जप्त करून मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत पोलीस कर्मचारी अशोक विठ्ठलराव नागरगोजे यांनी फिर्याद दिली. त्यावरून टिप्पर चालक शेख जुबरे चाँद व त्याच्या सोबतची व्यक्ती सय्यद युसुफ सय्यद इनायत अली या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत पोलिसांनी २६ मे रोजी वसमत रोड भागात कन्हय्या हॉटेलसमोर अवैध वाळू घेऊन जाणारा एमएच ०४ सीयू ६५२० क्रमांकाचा टिप्पर पकडले. त्यात दोन ब्रास अवैध वाळू आढळून आली. याबाबत पोलिसांनी वाहनचालकाकडे पावतीची विचारणा केली असता त्याने चुकीची पावती दिल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलीस कर्मचारी विलास आनंदराव बळवंते यांनी बुधवारी फिर्याद दिली. त्यावरून टिप्पर चालक बळीराम माणिक पुरी (दुसलगाव ता. गंगाखेड) याच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.