शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज आणि शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 14:35 IST

farmer suicide : मृत शेतकऱ्याच्या खिशात आधालेल्या दोन चिठ्या

गंगाखेड: तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील एका व्यक्तीने खाजगी कर्ज व शेतीच्या वादाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१ ) दुपारी चार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली होती. याप्रकरणी रात्री उशिरा चौघांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील रामेश्वर दत्तराव भिसे ( ५१ ) वर्ष यांनी सोमवारी दुपारी परभणी रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या मागील शेतात विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांचा मुलगा संदिप रामेश्वर भिसे याने शेत शेजारी अनिल राठोड यांच्या मदतीने दुचाकीवरून त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. 

जमादार रंगनाथ देवकर, पो. ना. एकनाथ आळसे यांनी रुग्णालयात पंचनामा केला. भिसे यांच्या खिशात दोन चिठ्ठया आढळून आल्या. त्यात कर्ज व शेतीच्या वादाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी संदीप रामेश्वर भिसे यांनी सोमवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात ताक्रार दिली. यावरून बाबासाहेब बापूराव कांबळे, लिंबाजी कबाजी उर्फ कबीर भिसे ( दोघे रा. पिंप्री, झोला ), आदेश अजय रुद्रवार व वैभव अजय रुद्रवार ( दोघे रा. गंगाखेड ) अशा चौघांविरुद्ध कलम ३०६ अन्वये मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि विकास कोकाटे हे करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीparabhaniपरभणी