शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : परभणीतील संचारबंदी २५ मेपर्यंत वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 20:29 IST

जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होण्यासाठी २५ तारखेची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़ 

ठळक मुद्देकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायपरभणी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

परभणी : जिल्ह्यात २५ मेपर्यंत संचारबंदी लागू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी सायंकाळी एका आदेशानुसार घेतला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होण्यासाठी २५ तारखेची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़ 

परभणी जिल्ह्यात १७ मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे़ सलग १६ दिवस जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही़ त्यामुळे आॅरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता़ नागरिकांनाही व्यवहार सुरळीत होण्याच्या आशा लागल्या़ मात्र १५ मे रोजी जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील तिघांना कोरोनाची लागण झाल्याने ग्रीन झोनच्या आशेवर पाणी फेरले गेले़ जिल्ह्यात ग्रीन झोनच्या कोणत्याही सवलती अद्याप लागू नाहीत़ उलट जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली संचारबंदी १७ मे रोजी संपणार आहे़ त्यामुळे देश पातळीवरील नवीन लॉकडाऊन आणि जिल्ह्यातील संचारबंदी या विषयी नागरिकांना उत्सुकता लागली होती़ 

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील व्यवहार सुरू होतील़ किमान लघु व्यवसायाला सवलती दिल्या जातील, अशी येथील नागरिकांना अपेक्षा होती़ मागील ५३ दिवसांपासून व्यवहार ठप्प असल्याने लघु व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे़ या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काळात थोडी शिथिलता मिळेल, अशी अपेक्षा जिल्हावासियांना होती़ मात्र शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश जारी केला असून, त्यात परभणी जिल्ह्यात २५ मेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहित १९७३ चे कलम १४४ लागू केले आहे़ या काळात पूर्वी सूट असलेल्या अत्यावश्यक सेवा, आस्थापनांना सूट देण्यात आली आहे़ या आस्थापना सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे़ 

जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्येक वेळी ग्रीन झोनच्या सलवतींची आशा लागलेली असतानाच ऐन शेवटच्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ग्रीन झोनच्या सलवतींपासून मुकावे लागत आहे़  पुणे येथून आलेला युवक हा शेवटच्या टप्प्यात परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळला़ त्यानंतर हा युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर सेलू येथील महिला नांदेडमध्ये कोरोनाबाधित आढळली; परंतु, प्रशासनाच्या चुकीमुळे परभणी जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश झाला नव्हता़ यावेळीही ग्रीन झोनच्या आशा लागलेल्या असतानाच पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पाणी फेरले आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी