coronavirus : मुंबईहून सोनपेठमध्ये परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:36 IST2020-05-18T19:36:01+5:302020-05-18T19:36:17+5:30

मुंबईतील जोगेश्वरी येथे बांधकामावर काम करणारे ९  मजूर टेम्पोने सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे दाखल झाले होते़

coronavirus: Coronavirus infection to a woman returning from Mumbai to Sonpeth | coronavirus : मुंबईहून सोनपेठमध्ये परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण

coronavirus : मुंबईहून सोनपेठमध्ये परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण

सोनपेठ (जि़परभणी) : तालुक्यातील शेळगाव येथे मुंबईहून परतलेली एक ४५ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे़ १८ मे रोजी प्रशासनाला या महिलेचा अहवाल  प्राप्त झाला आहे़ 

मुंबईतील जोगेश्वरी येथे बांधकामावर काम करणारे ९  मजूर टेम्पोने सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे दाखल झाले होते़ या सर्वांची सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती़ या तपासणीनंतर तिघांना रुग्णालयामध्ये क्वारंटाईन करण्यात आले तर उर्वरित ६ जणांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले होते़ रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या तिघांचे स्वॅब नमुने १५ मे रोजी तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात आले होते़ त्यापैकी ४५ वर्षीय महिलेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती १८ मे रोजी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे़ त्यामुळे सोनपेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, या महिलेच्या संपर्कातील क्वारंटाईनमध्ये असलेल्या ६ व्यक्तींचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे़
 

 

Web Title: coronavirus: Coronavirus infection to a woman returning from Mumbai to Sonpeth