शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कौतुकास्पद ! आजारी वडीलांना भेटण्यास आलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास परभणीतून परत पाठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:51 IST

परभणी जिल्ह्यातील सातोना चेक पोस्टवरील प्रकार

ठळक मुद्देमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सेलूचे रहिवासी चेक पोस्टवर प्रवेश नाकारून त्यांना परत पाठवले

सेलू: आजारी असलेल्या वडीलांना भेटण्यासाठी मुंबई येथून सेलूत येत असलेल्या एका वरिष्ठ अधिका-यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि परभणी सीमेवर असलेल्या सातोना  जिल्हा सीमेवरून पोलिसांनी परत पाठवले आहे. हा  प्रकार रविवारी सातोना चेक पोस्टवर घडला.

सुञांनी दिलेल्या माहितीनुसार सेलू येथील विद्यानगर मधील  रहिवासी तथा मुंबई येथील मंञालयातील  शिक्षण विभागातील अव्वर सचिव संतोष गायकवाड यांच्या वडीलांची तब्येत प्रकृती बरी नसल्याने त्यांना सेलू येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी गायकवाड हे मुंबईहून मोटारीने सेलू कडे निघाले. परभणी आणि जालना जिल्हा सीमेवरील सातोना चेक पोस्टवर त्यांची मोटार रविवारी राञी ७ वाजेच्या सुमारास आल्यानंतर चेक पोस्टवरील पथकाने विचारपूस केली. तसेच अधिक चौकशी केली. त्यानंतर तहसीलदार बालाजी शेवाळे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना या विषयी माहिती दिली. पंरतु, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार इतर जिल्हयातून एकही व्यक्ती येणार नाही. तसेच त्यांना परभणी जिल्ह्यात प्रवेश देऊ शकत नाही. असे सांगितल्यानंतर अव्वर सचिव संतोष गायकवाड यांना परत फिरावे लागले. 

हाॅटस्पाॅट वरून आल्याने प्रवेश नाकारला वरिष्ठ अधिकारी संतोष गायकवाड हे मुंबई येथून सेलूत येत होते. मुंबई शहरातील कोरोनाचे अधिक रूग्ण असलेल्या वरळी, वांद्रे येथे ते असतात. हा भाग कोरोना हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथून आलेल्या व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार गायकवाड  यांना जिल्हयात प्रवेश दिला तर त्यांना क्वारंटाईन केले जाईल. आजारी वडीलांना उपचारासाठी त्यांना  मुंबईला घेऊ जाता येते. असे पर्याय त्यांना देण्यात आले होते. - बालाजी शेवाळे, तहसीलदार, सेलू 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी