शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : परभणीत ५० फळे, भाजी विक्रेत्यांची जागेवरच केली कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 19:39 IST

परभणी शहरासह जिल्हाभरात संचारबंदी असतानाही अनेक व्यक्ती व हातगाडे चालक रस्त्यावर सर्रास वावरताना दिसून येत आहेत.

परभणी: शहरातील मुख्य बाजारपेठेसह वसमत रोड व जिंतूर रोड भागात रस्त्यावर फळे व भाजीपाला विकणाऱ्या ५० व्यक्तींची शुक्रवारी जागेवरच उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या पथकाने आरटीपीसीआर चाचणी केली.

परभणी शहरासह जिल्हाभरात संचारबंदी असतानाही अनेक व्यक्ती व हातगाडे चालक रस्त्यावर सर्रास वावरताना दिसून येत आहेत. अशांवर यापूर्वी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दंडात्मक कारवाई केली होती. संचारबंदीत दुकान उघडणाऱ्या काही व्यावसायिकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी डॉ. कुंडेटकर यांनी कारवाईचे स्वरूप बदलले. शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, अपना कॉर्नर, जिंतूर रोड, वसमत रोड, शिवाजी नगर आदी भागात फिरून त्यांनी रस्त्यालगत थांबून फळे व भाजीपाला विकणाऱ्या व्यक्तींची आरोग्य विभागाच्या पथकाला सोबत घेऊन जागेवरच आरटीपीसीआर चाचणी केली. दुपारी १२ ते ४ या वेळेत राबविलेल्या या मोहिमेत दिवसभरात ५० जणांची चाचणी करण्यात आली. संबंधितांचा चाचणी अहवाल शनिवारी येणार असून, त्यांना तो तातडीने कळविला जाणार आहे. बाधित आढळलेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ. कुंडेटकर म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी