शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात !.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

दैनंदिन गरजेचे खर्चांबरोबरच विनाकारण खर्च करण्याची सवय अनेकांना लागली होती. कोरोनाच्या संसर्ग काळात व्यवहार बंद असल्याने हे सर्व खर्च ...

दैनंदिन गरजेचे खर्चांबरोबरच विनाकारण खर्च करण्याची सवय अनेकांना लागली होती. कोरोनाच्या संसर्ग काळात व्यवहार बंद असल्याने हे सर्व खर्च कपात झाले. त्यातून नागरिकांना बऱ्यापैकी कपातीची सवय लागली आहे. मागील दीड वर्षांपासून घरखर्च आटोक्यात आणत मिळणाऱ्या रकमेवरच भागविले जात आहे. पूर्वी कुटुंबासह बाहेर जेवण करण्यासाठी जाण्याची हौस अनेकांना होती. परंतु, लॉकडाऊनने ही सवय मोडीत काढली आहे. हॉटेलमध्ये जाऊन जेवणारा केला जाणारा खर्च टाळला जात आहे. याशिवाय वीज बिल, मोबाइलवर होणारा खर्च, पेट्रोल, डिझेल खर्चातही अनेकांनी कपात केली असल्याचे दिसून येत आहे.

कुठे कुठे केली

कॉस्ट कटिंग

लॉकडाऊनपूर्वी आठवड्यातून दोन-तीन वेळा कुटुंबासह बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जात होतो. लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स बंद होते. त्यामुळे घरीच विविध पदार्थ करून खाण्याची सवय लागली.

प्रवासावरही मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता. महिन्यातून किमान दोन-तीन वेळा गरज नसतानाही प्रवास केला जात होता. मागील काही महिन्यांपासून विनाकारण प्रवास करणे टाळले जात आहे.

वीज बिल, मोबाइलचा डाटा यासाठी देखील अनावश्यक खर्च होत होता. नको असलेले किंवा अतिरिक्त असलेले मोबाइल क्रमांक बंद करून गरजेएवढेच मोबाइल सुरू ठेवले जात आहेत.

हॉटेलिंग थांबविल्याने दोन हजार वाचले...

एन्जॉय म्हणून बाहेर जेवायला जात असे. मुलांनाही त्याची सवय लागली होती. त्यामुळे महिनाभरातून किमान एखाद्यावेळी तरी हॉटेलमध्ये जेवण करीत होतो. त्यामुळे महिनाभरातून एक ते दीड हजारांचा खर्च होत होता. तो वाचला आहे, असे अनिल गायके यांनी सांगितले.

दररोजच्या जेवणासाठी पूर्वी आठवडाभराच्या भाज्या एकाच वेळी घेतल्या जात होत्या. त्यात अनेक वेळा काही भाज्या खराबही होत होत्या. त्यामुळे आता दररोजची भाजी दररोज खरेदी करण्याची सवय लावली. किमान ५०० रुपयांची बचत झाल्याचे फुलपगार यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात सलून्स बंद असल्याने दाढी घरी करण्याची सवय लागली. पूर्वी महिन्यातून तीन ते चार वेळा दाढी करण्यासाठी सलूनमध्ये जात होतो. आता मात्र घरीच दाढी करीत आहेत. त्यामुळे महिन्याकाठी ७० ते ८० रुपयांची बचत करीत असल्याचे लक्ष्मण वैद्य यांनी सांगितले.