शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वीज गेल्याने लावलेला दिवा मांजराने पाडला; आगीत होरपळून पती-पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:16 IST

कावलगाव येथे घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचाही उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला.

ठळक मुद्देमध्यरात्री  वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्यांनी घरात रॉकेलचा दिवा लावला.

पूर्णा (जि. परभणी) : वीजपुरवठा खंडित झाल्याने घरात पहाटेच्या वेळी लावलेला दिवा पत्नीच्या अंगावर पडल्याने तिला वाचविण्यासाठी गेलेला पतीही गंभीर भाजला. 

कावलगाव येथे घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचाही उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी चुडावा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. याबाबत चुडावा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कावलगाव येथील मुनवर खान मोहम्मद खान पठाण (२५) व त्याची पत्नी मैमुना मुनवर खान (२५) हे दोघे १९ जुलैच्या रात्री घरी झोपले होते. 

मध्यरात्री  वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्यांनी घरात रॉकेलचा दिवा लावला. पहाटेच्या सुमारास मांजराच्या धक्क्याने हा दिवा मैमुना मुनवर खान यांच्या अंगावर पडला. त्यामुळे त्यांच्या कपड्याने पेट घेतला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती मुनवर खान मोहम्मद खान पठाण हे धावले. या घटनेत मैमुना खान या ८५ टक्के, तर त्यांचे पती मुनवर खान हे ६५ टक्के भाजले. त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २३ जुलै रोजी मैमुना खान यांचा, तर २४ जुलै रोजी मुनवर खान यांचा मृत्यू झाला. शेख रोशन शेख खाजामियाँ यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण, जमादार केजगीर तपास करीत आहेत.  

टॅग्स :fireआगDeathमृत्यूparabhaniपरभणी