मुलाखत प्रक्रिया बंद केल्याने उमेदवारांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST2021-05-09T04:18:06+5:302021-05-09T04:18:06+5:30

मनपा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागात १२८ विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ...

Care of candidates by closing the interview process | मुलाखत प्रक्रिया बंद केल्याने उमेदवारांची हेळसांड

मुलाखत प्रक्रिया बंद केल्याने उमेदवारांची हेळसांड

मनपा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागात १२८ विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी उमेदवारांकडून २९ एप्रिल ते १५ मे या कालावधीत अर्ज मागविले होते. तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत देण्याचेही जाहिरातीत सूचित केले होते. ७ मे रोजी मनपा प्रशासनाने कार्यालयाबाहेर नोटीस लावून प्रत्यक्ष मुलाखती बंद केल्याचे सुचविले आहे. मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहत असल्याचे कारण देत या मुलाखती बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होत आहे.

यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून हा प्रकार हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. तेव्हा जाहिरातीत दिल्याप्रमाणेच अर्ज स्वीकारणे व मुलाखतीची प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, पिंटू कदम आदींनी केली आहे.

Web Title: Care of candidates by closing the interview process