घरापुढील दुचाकी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:17 IST2021-03-19T04:17:00+5:302021-03-19T04:17:00+5:30

परभणी : तालुक्यातील सुरपिंपरी येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना ८ मार्चच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी ...

The bike in front of the house disappeared | घरापुढील दुचाकी गायब

घरापुढील दुचाकी गायब

परभणी : तालुक्यातील सुरपिंपरी येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना ८ मार्चच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी १६ मार्च रोजी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड येथील पेरुलाल भानूलाल मेवाडा यांचे सुरपिंपरी येथे दुकान आहे. ते गावात भाड्याने राहतात. दिनांक ८ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच २२ ई २२५६) ही घरासमोर उभी केली व त्यानंतर ते झोपले. ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्यांना आपली दुचाकी जागेवर नसल्याचे दिसले. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता, ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी दैठणा पोलीस ठाण्यात १६ मार्च रोजी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The bike in front of the house disappeared