पैशांच्या वादातून लहान भावाची मोठ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST2021-07-07T04:22:13+5:302021-07-07T04:22:13+5:30

रेणाखळी येथील भगवान रुख्माजी ब्रह्मराक्ष यांनी त्यांचा लहान भाऊ भीमराव ब्रह्मराक्ष यांचा व स्वत: त्यांचा असा दोघांचा मिळून ४५ ...

Big beating of younger brother over money dispute | पैशांच्या वादातून लहान भावाची मोठ्यास मारहाण

पैशांच्या वादातून लहान भावाची मोठ्यास मारहाण

रेणाखळी येथील भगवान रुख्माजी ब्रह्मराक्ष यांनी त्यांचा लहान भाऊ भीमराव ब्रह्मराक्ष यांचा व स्वत: त्यांचा असा दोघांचा मिळून ४५ टन ऊस गावातील गणेश संतराम देफाळे यांचे नावाने साखर कारखान्याला दिला होता. त्याचा ९० हजारांचा पहिला हप्ता त्यांना आल्यानंतर ही रक्कम दोघांनी आपसात वाटून घेतली. त्यानंतर ४ जुलै रोजी दुपारी २.३० च्या सुमारास भगवान ब्रम्हराक्ष हे त्यांच्या शेतीत काम करीत असताना त्यांचा भाऊ भीमराव ब्रम्हराक्ष हा तेथे आला व त्याने भगवान यांना उसाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम देण्याची मागणी केली. त्यावेळी भगवान ब्रम्हराक्ष यांनी ही रक्कम गणेश देफाळे यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पैसे आल्यानंतर आपण ती रक्कम वाटून घेऊन असे सांगताच भीमराव याने त्यांना शिवीगाळ करीत बाजूचा दगड घेऊन त्यांच्या डोक्यात मारला. यात भगवान यांना दुखापत झाली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी इतरांनी येऊन सोडवासोडव केली. याबाबत भगवान ब्रम्हराक्ष यांनी पाथरी पोलीस ठाण्यात ४ जून रोजी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांत भीमराव ब्रम्हराक्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Big beating of younger brother over money dispute