शेतीच्या वादातून लोखंडी गजाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:16 IST2020-12-24T04:16:47+5:302020-12-24T04:16:47+5:30

डोंगरगाव येथील ललिता भगवान खांडेकर व त्यांच्या आई सिंधूबाई बन्सी कुंडगीर या सोमवारी सायंकाळी गट नंबर ३३४ मधील त्यांच्या ...

Beaten with iron rods over agricultural disputes | शेतीच्या वादातून लोखंडी गजाने मारहाण

शेतीच्या वादातून लोखंडी गजाने मारहाण

डोंगरगाव येथील ललिता भगवान खांडेकर व त्यांच्या आई सिंधूबाई बन्सी कुंडगीर या सोमवारी सायंकाळी गट नंबर ३३४ मधील त्यांच्या शेतात तूर कापणी करीत असताना संतराम तुकाराम सोडगीर, सविता संतराम सोडगीर (दोघे रा. डोंगरगाव) व बाळासाहेब मदने, त्यांची पत्नी शिवकांता मदने (दोघे रा. कुंभकर्ण टाकळी ता. परभणी) हे चौघे शेतात आले. हे शेत आमचे आहे. तुम्ही तूर का मोडतात, असे म्हणून संतराम सोडगीर याने लोखंडी गजाने ललिता खांडेकर यांना मारहाण केली. शिवकांता मदने व बाळासाहेब मदने यांनीही मारहाण केली. या प्रकरणी ललिता खांडेकर यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक गोविंद मुरकुटे तपास करीत आहेत.

Web Title: Beaten with iron rods over agricultural disputes