शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दस्तावेजाच्या आधारे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान लाटल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:57 IST

अधिकारी-कर्मचाऱ्यांसह १५ जणांवर गुन्हा

परभणी : बनावट दस्ताऐवजाच्या आधारे लाभार्थी भासवून ७५ लाखांचे अनुदान उचलल्या प्रकरणी महिला व बालकल्याण विभागातील ४ अधिकारी, ७ कर्मचारी आणि संस्थाचालकांसह एकूण १५ जणांवर नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश रघुनाथ कांगणे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात दोन फिर्यादी दाखल केल्या आहेत. गुरुवारी मध्यरात्री दाखल करण्यात आलेल्या पहिल्या फिर्यादीत लातूर येथील मधुमती महिला मंडळ संचलित परभणी येथील सत्कार कॉलनी येथील स्वाधारागृहात २०१६, २०१७ व २०१८ या तीन वर्षात बोगस लाभार्थी दाखविले आहेत. त्याचबरोबर २०१९ मध्ये पर्यवेशित दोन बालके असताना त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे एकही सुविधा पुरविण्यात आली नाही. शिवाय बोगस लाभार्थी रजिस्टरला दाखवून खोटे दस्तऐवज तयार करुन ते खरे दर्शवून शासकीय कार्यालयात दाखल केले. त्यानंतर २०१६-१७ या आर्थिक वर्षात १४ लाख २१ हजार व २०१७-१८ या आर्थिक वर्षात १४ लाख २१ हजार असे एकूण २८ लाख ४२ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त करुन शासकीय रक्कमेचा अपहार केला. २०१८-१९ या आर्थिक वर्षात १४ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुन लिना हनुमंत कोल्हे (रा.प्रकाशनगर, लातूर) व इतर १५ आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसरी फिर्यादही महिला व बालविकास अधिकारी रमेश कांगणे यांनी शुक्रवारी नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिली. त्यामध्ये जवळपास ३२ लाख रुपयांचे बनावट कागदपत्राच्या आधारे अनुदान लाटल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये महिला व बालविकास कार्यालयातील वर्ग १ चे ४ अधिकारी, ७ कर्मचारी तसेच संस्था अध्यक्ष यांच्यासह एकूण १५ आरोपींचा समावेश आहे. कांगणे यांनी फिर्याद दिली असली तरी या संदर्भातील नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांची स्वाक्षरी झाली नसल्याने याबाबतची प्रत उपलब्ध होऊ शकली नाही. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती भेटजिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे या संदर्भात दोन संस्थांच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सदरील स्वाधारगृहाला भेट दिली. त्यावेळी तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्वाधारगृहात मोजकेच कर्मचारी त्यांना जेवढे सांगितले, तेवढेच बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कांगणे यांना चौकशी करुन अहवाल देण्याचे सांगितले. विशेष म्हणजे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कांगणे यांनीही या संस्थांना अचानक भेटी दिल्या. त्यावेळेसही या संदर्भातील बनवाबनवी त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर कांगणे यांनी केलेल्या चौकशीत दोन्ही तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. त्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे आदेश कांगणे यांना दिले. त्यानुसार कांगणे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

दोन संस्थासंदर्भात तक्रारी आल्या होत्या. चौकशीअंती त्यामध्ये तथ्य आढळून आले. या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.-पी. शिव शंकर, जिल्हाधिकारी 

टॅग्स :parabhaniपरभणीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी