शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

ऑनर किलिंग प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 3:47 PM

परळी येथील अजय अशोक भोसले (१७) या युवकाचे पूर्णा येथील रेल्वेस्थानक परिसरातून अपहरण करून परळी येथे त्याचा खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती.

ठळक मुद्देया प्रकरणात ६ आरोपी निष्पन्न झाले होते. आरोपी घमंडसिंग सुरजसिंग जुन्नी, राजुसिंग जुन्नी हे २ वर्षांपासून फरार होते

परभणी : दोन वर्षांपूर्वी घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणात पूर्णा पोलिसांना हव्या असलेल्या एका आरोपीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री परळी येथून अटक केली आहे.

परळी येथील अजय अशोक भोसले (१७) या युवकाचे पूर्णा येथील रेल्वेस्थानक परिसरातून अपहरण करून परळी येथे त्याचा खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मयत तरुण अजय याची आई मंगलबाई भोसले यांनी परळी येथील पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण पूर्णा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. तत्कालीन पोलीस अधिकारी तथा फौजदार चंद्रकांत पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यात प्रेम प्रकरणातून अजय याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची बाब समोर आली होती. 

या प्रकरणात ६ आरोपी निष्पन्न झाले होते. आरोपी रुजूबाई बावरी, शक्तीसिंग बावरी, बच्चन सिंग बावरी, चरणसिंग बावरी, यांच्यासह या प्रेम प्रकरणातील मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर मयत अजय याचा मृतदेह शोधून काढण्यात आला. या प्रकरणाच्या काही दिवसांनी प्रेम प्रकरणातील मुलीनेही आत्महत्या केली होती. अजय याच्या खून प्रकरणात पोलिसांनी शक्तीसिंग बावरी, बच्चनसिंग बावरी, चरणसिंग बावरी यांना अटक केली होती. सध्या हे आरोपी जेलमध्ये आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपी घमंडसिंग सुरजसिंग जुन्नी, राजुसिंग जुन्नी हे २ वर्षांपासून फरार होते. त्यातील घमंडसिंग जुन्नी हा परळी येथे असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून १० डिसेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपीला पूर्णा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीHonor Killingऑनर किलिंग