ऑक्सिजनच्या ५५५ खाटा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:19+5:302021-06-02T04:15:19+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात खाटांची सुविधा निर्माण केली आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून बाधित ...

555 oxygen beds empty | ऑक्सिजनच्या ५५५ खाटा रिक्त

ऑक्सिजनच्या ५५५ खाटा रिक्त

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात खाटांची सुविधा निर्माण केली आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. गंभीर लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. गंभीर लक्षणे लक्ष असणाऱ्या रुग्णांसाठी १ हजार ३६ ऑक्सिजन खाटांची निर्मिती करण्यात आली. सध्या अतिदक्षता विभागात ऑक्सिजन खाटांवर ७७ रुग्ण उपचार घेत असून, २२ रुग्णांना व्हेंटिलेटरवर उपचार दिले जात आहेत. या विभागात ४२७ खाटा रिक्त आहेत. अतिदक्षता विभाग वगळता ८२ रुग्ण ऑक्सिजन खाटावर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकूण ५५५ ऑक्सिजन खाटा रिक्त आहेत. कोरोना रुग्णालयांमध्ये १ हजार ५६० खाटांचे निर्मिती करण्यात आली असून, सध्या केवळ २९७ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. १ हजार २६३ खाटा रुग्णालयात रिक्त आहेत.

कोरोना केअर केंद्र ओस

जिल्ह्यातील कोरोना केअर केंद्रही रुग्णांअभावी ओस पडले आहेत. परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य विभागाने कोरोना केअर केंद्र सुरू केले होते. या ठिकाणी कमी लक्षणे असणाऱ्या बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोना केअर केंद्रात २ हजार ३७३ खाटा उपलब्ध असून सध्या या केंद्रात १५४ रुग्ण उपचार घेत आहेत. २ हजार ११९ खाटा रिक्त आहेत. जिल्हाभरात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ३ हजार ९३३ खाटाची निर्मिती करण्यात आली होती. सध्या एकूण ४५१ रुग्ण उपचार घेत असून ३ हजार ४४२ खाटा रिक्त आहेत.

Web Title: 555 oxygen beds empty