शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

भित्र्या सशाचा गरुड होईल का?

By admin | Updated: July 23, 2015 18:28 IST

एक गरुड असतो, एक ससा. गरुड मस्त खाऊन पिऊन येतो

एक गरुड असतो, एक ससा.
गरुड मस्त खाऊन पिऊन येतो 
आणि झाडाच्या उंच फांद्यावर बसून राहतो आरामात.
ससा बिचारा लुसलुशीत गवत खातो,
पण त्यासाठी वणवणतो.
मग मिट्ट अंधा:या बिळात जाऊन राहतो.
त्याला गरुडाचा भारी हेवा वाटतो.
कसलं भय नाही, कसलं टेन्शन नाही.
मस्त राहतो फांद्यावर उंचच उंच बसून.
आणि आपण आपले घाबरेघुबरे होत बिळात घुसतो!
एकदा तो गरुडाला विचारतो की,
तुला हे कसं काय जमतं, असं मस्त खाऊन आरामात बसणं,
दिवसभर वाटेल तेव्हा हवेत तरंगण.
तू कधी वणवण करताना का दिसत नाहीस.
आणि मी कायमच कसा खाण्यापिण्याच्या शोधात
आणि उरलेला वेळ बिळात.
जरा बागडलं तरी असं वाटतं की,
नको आपल्या जिवाला धोका आहे.
मी कधीच का तुङयासारखा निवांत बसू शकत नाही?
गरुड हसतो.
म्हणतो, अरे तुला कुणी अडवलंय का निवांत बसायला?
तूच घाबराघुबरा होतो.
तुला वाटतं आपल्या जिवाला भीती आहे.
तुला वाटतं, आज मऊ मस्त गवत मिळालं उद्या मिळेल का?
तुला वाटतं, कुणी आपल्याला खाऊन टाकेल.
तुला वाटतं की, आपण फार देखणो आहोत.
पण मनात आणलं तर इतरांना खूप उपद्रव करू शकू.
हे सारं मित्र तुला वाटतं.
त्यातलं काही असेलही खरं!
पण तू पण मस्त बागड की, खाऊन झाल्यावर कुणी अडवलंय?
बिळात घूस म्हणून कोणी मागं लागलंय?
पण नाही ती सारी बंधनं तू स्वत:वर लादली आहेस.
आणि हे सारं कमी म्हणून की काय, आपल्यापेक्षा उंचावर कोण आहे
हे सतत मान वर करून पाहिल्यानं बरोबरीच्यांशी,
तुङयापेक्षा लहान असलेल्यांशी
आणि अवतीभोवतीच्या वातावरणाशी तुझी दोस्तीच होत नाही.
मला माङो प्रश्न आहेतच.
मी खातोपितो, शेंडय़ावर बसतो.
कधी उडतो, पण असुरक्षितता आणि अशाश्वतता आहेच.
पण जे होईल ते होईल म्हणत मी आपण गरुड आहोत, उडत जाऊ असं म्हणून करतो स्वत:वर जोक.
मित्र, आपल्यावर आपण लादलेली बंधनं सोड.
मग तुला निवांतपणा मिळेल.
***
आपण कधी गरुड होऊन ‘टॉप’वर पोहचू असं वाटणा:या सगळ्याच भित्र्या सशांनी एकदा विचारावं स्वत:ला की, ससा असणं हे आनंददायी नसतं का?
 
(एका लोककथेच्या संदर्भानं साभार.)