अनलॉकिंगनंतर तरुण मुलं काय खरेदी करत आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:55 PM2020-06-18T13:55:11+5:302020-06-18T13:56:52+5:30

ऑनलाइन शॉपिंग अॅप्स अंदाज  घेत आहेत. त्यातली ही काही निरीक्षणं.

What are young kids buying after unlock? | अनलॉकिंगनंतर तरुण मुलं काय खरेदी करत आहेत?

अनलॉकिंगनंतर तरुण मुलं काय खरेदी करत आहेत?

Next
ठळक मुद्दे जिन्स आणि जॉगर्स

- निकिता बॅनर्जी

लॉकडाऊनच्या काळात फॅशन हा विषय कुणासाठी महत्त्वाचा होता?
लोक घरात होते. मॉल्स, दुकानं बंद होती. भारतातच नाही तर जगभर हेच चित्र होतं.
मग हळूहळू अनलॉकिंग व्हायला लागलं. चीनमध्येही लॉकडाऊन सरलं, अमेरिकेत तर ब:यापैकी गोष्टी खुल्या होत्या.
मात्र ज्यांना स्ट्रेस आला, बोअर झालं, मूड छान करायचा आहे ते सगळे शॉपिंगक्रेझी लोक मात्र ब:यापैकी सावध होते. याकाळात शॉपोहॉलिक असणा:या लोकांनीही शॉपिंग करणं नाकारलं, गरजेपेक्षा जास्त खर्च कुणी सहजी केला नाही.
वॉशिंग्टन टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख सांगतो, या कोविड महामारीने तरुणांच्या जगात एक मोठा बदल केला. विशेषत: मिलेनिअल्सच्या.
मिलेनिअल्सच्या जगात जगभरच शॉपिंगचा एकच ट्रेण्ड होता, त्याचं नाव, ‘बाय फॉर देमसेल्व्ह्ज’.
तरुण मुलं जास्तीत जास्त शॉपिंग हे स्वत:साठी करत.
अर्थातच त्यात कपडे, प्रसाधनं, चपलाबूट आणि गॅजेट्स, गेम्स यांचं प्रमाण अधिक होतं.
आता ऑनलाइन शॉपिंगचे अगदी चीनमधलेही आलेख सांगतात की, लॉकडाऊन संपल्यावर तरुण सर्वात अधिक स्वत:साठी खर्च करतील असा होरा होता, मात्र त्यांनी तसं न करता एकदम ट्रेण्डच बदलून टाकला.
त्याचं चित्र आता ‘बाय फॉर ऑदर्स’ असं दिसतं आहे. म्हणजेच तरुणांनी हाती जो पैसा होता, त्यात घरातल्या गरजेच्या वस्तू आणि घरातल्यांच्या गरजेच्या वस्तू घेतल्या.
महामारीच्या रेटय़ाने स्वत:पलीकडे दुस:याचा विचार करणं हे मिलेनिअल्सनाही जमतं असं सांगणारा हा ट्रेण्ड म्हणून मोलाचा आहेच.
आधीच हाती पैसा नाही, जॉबलॉस, पेकट हे सारं सोबत घेऊनच याही पुढे जगायचं आहे. आणि सोबत जिंदादीलही फॅशनही लागणारच आहेत, मग जगणं जरा कलरफु ल करायला आता फॅशनेबल तरुणांच्या दुनियेत त्यातल्या त्यात काय इन आणि आउट आहे, याचे ट्रेण्डही प्रसिद्ध होत आहेत.
ते अर्थात जास्त परदेशी आहेत कारण आपल्याकडे अनलॉक आता कुठं नीट होतंय.
मात्र तरी काही गोष्टी रंजक आहेत.

* स्लीपर इन, हाय हिल्स आउट!
स्लीपर ही काय फॅशनेबल गोष्ट आहे का? त्यातही पावसाळ्यात तर स्लीपर म्हटलं की लोटांगण अटळ. आणि कपडय़ावर मागून सगळी चिखलाची नक्षी.
मात्र सध्या ट्रेण्ड असं सांगतो की, स्लीपर जास्त लोक घेत आहेत. रनिंग शूज अर्थात सध्या शांत आहेत. आणि हाय हिल्स? त्या तर सध्या बाद होत आहेत. कारण हायहिल्स घालून जाणार कुठं? कसल्या पाटर्य़ा नि कसलं सेलिब्रेशन. त्यामुळे हायहिल्स सध्या बाद आहेत.

* लिपस्टिक ना सही, नेलपेण्ट सही
मास्क लावायचा तर लिपस्टिक कशाला असे जोक्सही भरपूर फिरतात. मास्कला लिपस्टिकचे डाग पडतात, किंवा कॉस्मेटिक वापर नको सध्या असं काहीही कारण सांगून लिपस्टिक सध्या बॅकसीटवर असली तरी सध्या नेलपेण्टचे चर्चे आहेत.
एकतर हात सतत धुवावे लागतात, ते देखणो दिसले तर उत्तम. त्यामुळे रिकाम्या वेळात नेलआर्ट यू-टय़ूबवर पाहून पाहून अनेकजणी नखांना सुंदर रंग लावून आपल्या जगण्यात जरा रंग भरत आहेत.

* जिन्स, जॉगर्स, लेगिन्स
अमेरिकन तारुण्य सध्या ऑनलाइन शॉपिंग अॅप्सवर काय ऑर्डर करत आहे असं शोधणारा अभ्यास सांगतो की, कपडय़ांची खरेदी मुळातच कमी झालेली आहे. मात्र तरीही ज्यांनी कपडे घेतले त्यांनी जिन्स, जॉगर्स आणि लेगिन्स यावरच अधिक भर दिला.
बाकी ड्रेसेस, शर्ट यांना तुलनेनं कमी मागणी होती. ड्रेसचे कॉम्बिेनशन करून घालणं हा ट्रेण्ड नवीन नाही पण आता महामारीनंतर ते अधिक जास्त रूळेल असं दिसतं.

 

Web Title: What are young kids buying after unlock?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.