शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्माण’ उपक्रमात सहभागी व्हायचंय?

By admin | Updated: July 24, 2014 19:55 IST

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा खास तरुण मुलांसाठीचा उपक्रम

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा खास तरुण मुलांसाठीचा उपक्रम. २00६ मध्ये त्याची सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाची, त्यात काम करणार्‍या मुलांच्या तळमळीची खूप चर्चाही झाली. पण नुस्ते समाजातील जटिल प्रश्नांची उकल शोधणं एवढंच या अभ्यासाला अभिप्रेत नाही तर त्यासोबतच स्वत:च्या जीवनासाठी आनंददायी प्रयोजन शोधणं, सुयोग्य करिअर निवडता येणं हेही या अभ्यासात अपेक्षित आहे. आपल्या जगण्याचं लक्ष्य काय? आपलं ध्येय काय? आपल्याला आयुष्यात नक्की काय कमवायचंय? आपल्याला सेटल व्हायचं म्हणजे काय करायचंय नक्की आयुष्यात?
या सार्‍या प्रश्नांची उत्तरं आपली आपण शोधत जावी या हेतूनं चालणारी निर्माण ही एक शोधप्रक्रियाच आहे.
पण असा स्वत:विषयीचा शोध घ्यायची ताकद आपलं शिक्षण आज कुठं देतं? करिअर आणि पैसा या दावणीला स्वत:ला बांधून घेत मुलं फक्त धावत आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक समृद्ध, समाधान, आनंद देणार्‍या गोष्टी कशा शोधता येतील याचा शोध निर्माणच्या या उपक्रमात घेण्याचा प्रयत्न केला जातो.
२00६ ते २0१४ या काळात निर्माणच्या याच प्रक्रियेतून ५ बॅच म्हणजेच महाराष्ट्रातील साडेपाचशेहून अधिक मुलं स्वत:ला शोधत गेली. त्यामध्ये तरुण डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शिक्षक, फिल्ममेकर, पत्रकार, शेतकरी, विज्ञान, कला, वाणिज्य शाखांचे पदवीधर आहेत. त्यौपकी १00 पेक्षा अधिक जण आज पूर्णवेळ सामाजिक समस्यांवर काम करत आहेत. दुर्गम भागात जाऊन आपला समाज बदलावा म्हणून प्रयत्न करत आहेत.
स्वत:ला शोधण्याची, वेगळ्या वाटेनं जाऊन पहायची, चाकोरी सोडायची आणि तरीही चाकोरीतल्या प्रश्नांना भिडण्याची तयारी असेल तर ‘निर्माण’ या शोधप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आता उपलब्ध आहे. निर्माणची सहावी बॅच येत्या जानेवारीत सुरू होत आहे. प्रवेश अर्ज आणि त्यानंतर मुलाखती आणि कठोर चाळणीच्या निवड प्रक्रियेतून ज्यांची निवड होईल त्यांना निर्माणच्या उपक्रमात सहभागी व्हायची संधी मिळू शकते.
निर्माणमध्ये सहभागी व्हायचंय? 
http://nirman.mkcl.org/  या वेबसाइटवर जाऊन प्रवेश अर्ज डाऊनलोड करता येईल.
तो अर्ज त्वरित भरून या पत्त्यावर किंवा nirmanites@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा.
अंतिम मुदत? - १५ ऑगस्ट २0१४ संपर्क -  अमृत बंग - ९४२२५0१४९६
निखिल जोशी - ९४0५७४0३६0