सोप्या सीईटीचं कठीण गणित

By Admin | Updated: February 19, 2015 20:45 IST2015-02-19T20:45:11+5:302015-02-19T20:45:11+5:30

महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही

Simple CET's Difficult Mathematics | सोप्या सीईटीचं कठीण गणित

सोप्या सीईटीचं कठीण गणित

महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही. 
जेईईपेक्षा तुलनेनं सोपी सीईटी आता द्यावी लागेल या भावनेनं राज्यभर तरुण विद्यार्थी आणि 
त्यांचे पालक आनंदात आहेत. मात्र ‘सोप्या’ परीक्षेनं  भविष्याची वाट  आणि इंजिनिअरिंग शिक्षणाचा दर्जा आणखी घसरेल का? या विषयाची एक सडेतोड चर्चा..
 
जेईई घेणं चुकीचंच होतं,
सगळे सीबीएसई, इंग्रजी मीडियमवाले  त्यामुळे पुढं जातात, आपल्यावर अन्याय होतो, आता सीईटीच असल्याने, आपलं इंजिनिअरिंगचं ड्रीम पूर्ण झालंच असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
जेईई टफ आणि सीईटी सोपी, इंजिनिअरिंगपण सोपं आणि नोकरी मिळणं तर त्याहून सोपं
असाही कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
‘वायडी’ झालं तरी चालेल?  काही फिकीर नाही, आपण इंजिनिअर होणारच
असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
चला सुटलो, जेईईचं आता काही टेन्शन नाही, आता काय आपली लोकल सीईटी,
ती क्लिअर झाली काय नी नाही काय?  स्कोअर कितीही कमी आला,
तरी अँडमिशन मिळणारच, असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
पीसीएमला ४0% आहेत म्हणून काय झालं, अँडमिशन तर आपल्याला सहज मिळेल,
इंजिनिअरिंगला अँडमिशनचं काही टेन्शनच नाही, असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
इंजिनिअरिंगची ब्रँच कुठलीही असो, कॅम्पस्मधे लागतेच नोकरी,
नाहीतर काय, करू एमबीए!! आपल्याला काय पुढे मरण नाही,
असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
पटत नाहीये?....
 

 

Web Title: Simple CET's Difficult Mathematics