शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात ‘ती’ भेटली.

By admin | Updated: August 1, 2014 11:43 IST

सरसरत आठवणीची सर माझ्या अंतर्मनात शिरते आणि चिंबाड भिजवते. ‘तिच्या’ सहवासातला पाऊस मग माझ्या मनावर बरसतच राहतो.

सरसरत आठवणीची सर माझ्या अंतर्मनात शिरते आणि चिंबाड भिजवते. ‘तिच्या’ सहवासातला पाऊस मग माझ्या मनावर बरसतच राहतो. अशाच एका पावसात ‘ती’ भेटली.
अकोल्याच्या बसस्थानकातून मी आपली छत्री उघडून बाहेर पडलो.  साधारण सकाळी साडेनऊची वेळ असावी. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. गांधी चौकात जात असताना रस्त्यात ती दिसली. माझ्याच वयाची असेल. म्हणजे मी तेव्हा एकोणीस-वीस वर्षाच्या आसपास असेन.  सळसळतं तारुण्यच म्हणा ना !
ग्रामीण भागाचा टच असणारं राहणीमान पण एकूणच मनाला मोहवणारं तिचं रूप पाहून श्रावणात जोरदार सर यावी आणि लख्खं ऊन पडावं तसंच झालं. कारण रस्त्यावरची इतर इतकी माणसं सोडून तिनं मलाच पत्ता विचारावा, असं माझ्यात काय होतं? 
मी छत्री सावरत चाललो होतो, माझ्याच तंद्रीत. ती मात्र इमारतीच्या आडोशाला जणू माझी वाटच पाहत असावी. एकदम म्हणाली,  
‘शिवाजी कॉलेज किती लांब आहे येथून?’ मी पटकन बोलून गेलो.
‘तुला शिवाजी कॉलेजमध्ये जायचंय?’
‘हो.. तिथे मला अँडमिशन घ्यायची आहे.. पण पाऊस, छत्रीही नाहीये. रिक्षाही मिळत नाहीये.
(म्हणजे परवडणार नाहीये असाच टोन).’
  मी भीतभीतच म्हणालो, 
‘मी त्याच बाजूनं चाललो आहे. माझं कॉलेज त्याच रस्त्यावर आहे. यायचं असेल तर.?’ 
कुठलीही ओळख नाही. रस्त्यावर भर पावसात एखादी मुलगी भेटावी, बोलावी हा धक्का पचत नव्हताच, त्यात आपण तिला आपल्या छत्रीतून ये म्हणायची हिंमत करावी अजून काय हवं?
 तिनं मला वरून खालपर्यंत न्याहाळलं. तिला माझ्याबद्दल विश्‍वास वाटला असावा कदाचित. ती म्हणाली,
‘मग तर बरंच होईल. उगीच पुन्हा चुकायला नको. थेट कॉलेजपर्यंत सोडाल?’
‘हो चला ना’
असं म्हणताच ती माझ्या छत्रीत येऊन माझ्यासोबत चालायला लागली. श्रावणातला पाऊस अधूनमधून बरसत होता. एकाच छत्रीत आम्ही रस्त्यानं चालत गप्पा मारत जात होतो. एकमेकांची नावं विचारून झाली. ती खूपच समजदार वाटली. त्याचमुळे मी तिला चहा प्यायचा का असं विचारण्याची हिंमतही केली. टपरीवर आम्ही दोघांनी चहा घेतला. तिनंही जुन्या मित्राशी बोलावं त्या विश्‍वासानं गप्पा मारल्या. चालता रस्ता केव्हा संपला आणि तिचं कॉलेज केव्हा आलं हे कळलंसुद्धा नाही.. 
पाऊस काही थांबला नव्हता, पण ती गेली.
त्यानंतर आम्ही कधीही भेटलो नाही. ती पुन्हा कधी दिसली नाही.
पण पाऊस आला की ती आठवते.पहिली आणि शेवटचीच पाऊसभेट.
- मोहन शिरसाट