शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

इझी फोटो शेअर!

By admin | Updated: March 26, 2015 20:30 IST

इन्स्टाग्राम वापरून सगळ्या फोटोंना तेच तेच इफेक्ट्स येतात. पण असं एक अँप आहे जे तुमच्या फोटोंना एक भन्नाट मेकओव्हर देईल. त्याचं नाव आहे VSCO CAM

अमृता दुर्वे
 
फेसबुकवर आपण शेअर करत असलेले आपले फोटो छान, हटके दिसावेत असं सगळ्यांनाच वाटतं. म्हणून मग काहीजण आता हौशीनं इन्स्ट्राग्राम वापरतात. पण इन्स्टाग्राम वापरून सगळ्या फोटोंना तेच तेच इफेक्ट्स येतात. पण असं एक अँप आहे जे तुमच्या फोटोंना एक भन्नाट मेकओव्हर देईल. त्याचं नाव आहे  VSCO CAM
या अँपमधला कॅमेरा वापरून तुम्ही फोटो क्लिक करू शकता आणि एडिटही करू शकता. या इन कॅमेरा अँपमध्ये तुम्हाला मॅन्युअल फोकस, शटर स्पीड, व्हाइट बॅलन्स आणि एक्स्पोजरचे बरेच ऑप्शन्स मिळतील. 
यातून क्लिक केलेले फोटोज तुम्हाला गॅलरीमध्ये दिसतील किंवा मग तुम्ही तुमच्या डिफॉल्ट कॅमेर्‍यानं काढलेले फोटोही तुम्हाला गॅलरीतून अपलोड करता येतील. पेंट ब्रशवर टॅप केलं की फोटो एडिट करता येतील. या अँपमधलं पेंट ब्रश वापरून फिल्टर्स निवडा. स्क्रू ड्रायव्हरवर क्लिक केलं, की त्या त्या फिल्टरचे आणखीन कण्ट्रोल्स मिळतील. तिसर्‍या पर्यायानं ‘अनडू’ही करता येईल. 
इतर कोणत्याही अँप्सपेक्षा VSCO चे इफेक्ट्स भन्नाट आहेत आणि त्यातून तुमच्या फोटोंना भन्नाट लूकही देता येऊ शकेल. शिवाय फोटोला तुम्ही कलर टिण्टही देऊ शकाल. असे सारे प्रयोग करून तुम्ही फोटो सेव्ह केले की ते तुमच्या फोटो गॅलरीत दिसू लागतील. इन्स्टाग्रामसारखेच यावरही तुम्ही इतरांचे फोटो पाहू शकता. ट्राय करून पहा. डाउनलोड हे अँप फ्री डाउनलोड करता येतं.
http://vsco.co/vscocam या वेबसाइटवर जाऊन तुम्ही हे अँप डाउनलोड करू शकता.