शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख म्हणाला, सगळीच तारेवरची कसरत...

By admin | Updated: April 12, 2017 14:59 IST

जग नेहमीच सर्जनाला सगळ्यात प्रामाणिक भावना मानत आलंय... एक उच्च जागा बहाल करत आलंय हे समजून घेत नि पाहत मी वाढलो...

अमेरिकेतल्या येल या जगप्रसिध्द विद्यापीठाने शाहरूख खानला अतिशय प्रतिष्ठेच्या चब फेलोशीपने सन्मानित केलं. या फेलोशीपचा गौरव मिळालेला तो पहिला बॉलीवूड स्टार! हा सन्मान स्वीकारताना येलचे विध्यार्थी आणि प्राध्यापकांसमोर शाहरूखने यश-अपयश-संघर्ष आणि कष्ट या विषयावर स्वत:चे अनुभव सांगणारं फार सुंदर भाषण केलं होतं... शाहरुख जे जे म्हणाला त्याचं हे संकलन : आज भाग- दोन------------------जग नेहमीच सर्जनाला सगळ्यात प्रामाणिक भावना मानत आलंय... एक उच्च जागा बहाल करत आलंय हे समजून घेत नि पाहत मी वाढलो...जगण्यातून अनुभवलेल्या प्रसंगांना निरखत त्यांचं विश्लेषण करायचं ठरवलं तर मग केंद्रस्थानी येते ती माझी सर्जनशीलता, माझी क्रिएटिविटी! कलात्मक अभिव्यक्तीतून मी माझं जग घडवत जातो नि त्यातून मग जग मला अनुभवत राहातं.दुसरीकडे याच सर्जनशीलतेतून मिळणाऱ्या प्रसिद्धीतून संपत्ती, ग्लॅमर, डामडौल निर्माण झाला की त्यावर शंका घेणारं नि प्रश्न उपस्थित करणारंही जग हेच.आपण असं का करतो? - याचं कारण मला असं दिसतं, सर्जनशील काम करु न त्यावर श्रीमंतही झालेल्यांवर अशी उलट टीका केल्यामुळे ‘असल्यांपेक्षा’ आपण बरे अशी भावना टीका करणाऱ्यांना सुखावत असेल आणि दुसरं म्हणजे आमच्यासारख्यांच्या निर्मितीचा धाक वाटून पोटात गोळा येत असेल. अशा ‘प्रसिद्ध’ व्यक्तीच्या भवतीचं जग कसं दिसतंय यावरून आपण त्याची मापं नाहीतर का ठरवली असती?आय एॅम अ‍ॅन अ‍ॅक्ट! अशा दुहेरी जगण्याचा मी पुरावा...जॉर्ज बर्न म्हणाला होता, अभिनय म्हणजे निव्वळ प्रामाणिकपणा. जर तुम्ही तो खोटा केलात, तर तुम्ही अभिनय केलात खऱ्या अर्थानं!अभिनय म्हणजे काय याचं याहून अधिक स्पष्टीकरण जॉर्ज देऊच शकला नसता. एक सर्जनशील माणूस म्हणून मला सदासर्वकाळ हेच वाटत असतं... प्रामाणिक नि फसवं! एकाचवेळी...माझ्या स्किझोफ्रेनियाबद्दल सांगतो..क्रिएटिव्ह एक्सप्रेशन येतं कुठून तर कलाकाराच्या अतिशय खोल अनुभवातून. एक चांगला कलाकार त्याच्या सर्जनापासून नामानिराळा राहू शकत नाही. चांगली कला याचाच अर्थ प्रामाणिक कला. एखादा माणूस कलाकार असेल, लेखक असेल, शिल्पकार असेल, अभिनेता असेल किंवा देवदेवतांना साकार करणारा असेल, तो जो कुणी असेल, जर स्वत:शी निखालास प्रामाणिक असेल तर मानवी सर्जनशीलतेच्या संबंधातलं ठळक काम त्याच्याकडून घडून जातं. मात्र त्यात किंचितही बेईमानी असेल तर सगळं वायाच!आणखी एक विरोधाभास सांगतो... एकदा कलाकारानं कला सार्वजनिक केली, जनतेला सोपवली की तो त्याच क्षणी तीच्यापासून तो विभक्त होतो. ती निर्मिती त्याच्या मालकीची राहत नाही.इथं तुमची जिगर कळते... जर ती निर्मिती लोकांच्या स्वाधीन केलीय तर त्यांनी तिला स्वीकारावं किंवा गटारात टाकून द्यावं, त्यांची मर्जी.तरी घडतं वेगळंच. हाच मघापासून मी सांगत असलेला विरोधाभास. पुरस्कार स्वीकारल्यानंतर घरी परतत असताना कित्येकदा मी अतिशय उल्हासित नि खूष असतो. हातात माझ्याबद्दलचं काही टिपण असतं. मी वाचत असतो की या वर्षीचा सगळ्यात टुकार अभिनेता म्हणून खरं तर मला ‘गोल्डन बनाना’ मिळायला हवं होतं, वगैरे वगैरे...मी खूप दुखावून घेतो स्वत:ला. चिडतो, वैतागतो नि मला वाटतं की ती केळी नि समीक्षक दोघांच्याही साली काढून त्या तिकडं बसलेल्या माकडांना खायला घालाव्यात.त्या क्षणापुरती का होईना पण एकदा देऊन टाकलं की विसरण्याची माझी क्षमता लुप्त होऊन जाते. इथंच ती युक्ती दडलेली आहे बरं का! तुम्ही निराश असता, सगळं जग तुम्हाला रोखून बघत असतं आणि तुम्हाला स्वत:कडे निरखून पाहाणं भाग पडतं. इथं तगून राहण्याकरता एकच गोष्ट करता येते. तुम्ही स्वत: खूप खोल कोण आहात त्याला लगटून राहायचं. जग निर्दयी बनेल, ते तुम्हाला पाहू शकणार नाही. अशावेळी स्वत:ला पाहू शकण्याची युक्ती शिकणं खूप गरजेचंय.एका सर्जनशील व्यक्तीसाठी ही सगळी तारेवरची कसरतच.

पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

- आॅक्सिजन टीम