शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

आनंदाची चिवडा मिसळ

By admin | Published: October 30, 2014 8:22 PM

हाय फ्रेण्ड्स. अजून नाही ना उतरला हॅँगओव्हर, दिवाळीचा? दिवाळीतलं जोरदार सेलिब्रेशन झालं, सुट्टी संपली, रुटीन सुरू झालं तरी मन मात्र सुस्ती सोडत नाहीच.

हाय फ्रेण्ड्स.
अजून नाही ना उतरला हॅँगओव्हर, दिवाळीचा?
दिवाळीतलं जोरदार सेलिब्रेशन झालं, सुट्टी संपली, रुटीन सुरू झालं तरी मन मात्र सुस्ती सोडत नाहीच.
कामाचा मूड लागत नाही.
असं वाटतं नको ते कॉलेज नि ऑफिस, मस्त द्यावी ताणून.
अजून उरलंसुरलं फराळ आहेच डब्यात, ते टाकावं येता-जाता तोंडात. आणि पार डब्याच्या तळाशी गेलेला चिवडा.?
तेल निथळून पोहे फदक फदक करतात त्याच्यात, पण त्या चिवडय़ाची जी काय चव लागते ना.?
त्यात मस्त मित्र घरी बोलवायचे, मिसळ बनवायची आणि तो उरसुर चिवडा-शेव-चकलीचे तुटकेमुटके तुकडे मस्त घालायचे त्या मिसळीत.
- अशी मिसळ कुठल्याच हॉटेलात मिळत नाही!
-तिला म्हणायचं चिवडा मिसळ.
तोंडी लावायला मित्रंचा कल्ला. नुस्ता धांगडधिंग, पोटभर गप्पा आणि हसून हसून दुखणारं पोट.
-लाईफ इससे जादा और क्या खुबसुरत होगी?
*****
असं नाही वाटत की, आपण उगाच नाही  त्या गोष्टींच्या मागे धावत सुटतो.
छोटछोटय़ा गोष्टींचे इगो इश्यू 
आणि प्रेस्टिज पॉइण्ट्स बनवतो.
नसते लाईफस्टाईल स्टॅण्डर्ड सेट करत बसतो.
पण खरी गंमत तर ‘उरसुर चिवडय़ात’च आहे.
हे कळतं आपल्याला.?
मग ती गंमत पुरेपूर अनुभवणं.
जगून घेणं हे आपल्याच हातात असतं.
पण आपण नाकारतो हा आयुष्यातला खमंगपणा.?
कशासाठी??
*****
ठरवता येईल, आपल्याला की कुढणं-चिडणं, अकारण कुरकूर करणं बंद आणि भन्नाट जगणं सुरू. सुस्ती सोडा, फेसबुक-व्हॉट्सअॅपवरचा एकेकटा उदास कंटाळा बाजूला ठेवा.
आणि द्या झोकून स्वत:ला जगण्यात.
जे सोपंय ते करू ना आपण.!!
----------------------------------
TTMM म्हणजे  टेन्शन-टेंगळं-मस्ती-मॅजिक. म्हणजे काय?
तर तेच जे जे तुमच्या मनात, जगण्यात, बोलण्यात, कट्टय़ावर धुमाकूळ घालतं, ते ते सारंच !
म्हणजे तेच सारं, जे तुमच्या डोक्यात वळवळलं, तुम्हाला छळायला लागलं की वाटतं, लिहावं, आणि पाठवून द्यावं ‘ऑक्सिजन’कडे! मग वाट कसली पाहता.? लिहा बिंधास्त. आणि पाठवून द्या ‘ऑक्सिजन’कडे. आम्ही वाट पाहू. आणि तुम्ही लिहिलेलं एकदम ‘कडक’ असेल तर ते तुम्हाला या पानावर नक्की वाचायला मिळेल.
पत्ता?
ऑक्सिजन, लोकमत भवन, बी-3, एमआयडीसी अंबड, नाशिक, 422010