शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

मॉलामाल - ऑर्गनाईज्ड रीटेल

By admin | Updated: May 14, 2014 14:47 IST

‘मॉल रॅटिंग’ हा शब्द गेलाच असेल तुमच्या कानावरून.

‘मॉल रॅटिंग’ हा शब्द गेलाच असेल तुमच्या कानावरून.
मॉलमधले उंदीर? म्हणजे असे काही लोक जे कायम कुठल्या ना कुठल्या मॉलमध्ये पडीक असतात. काही विकत घ्यायचं असो नसो, काही खायचं प्यायचं असो नसो हे आपले मॉलमध्येच. विंडो शॉपिंग करत भरकटतात. त्यांना म्हणतात ‘मॉल रॅट्स’ आणि ते जे मॉलमध्ये पळापळ करतात त्याला म्हणायचं ‘मॉल रॅटिंग.’
अवतीभोवती पाहा, म्हणता म्हणता केवढे चकाचक मॉल उभे राहिले. लोकांची काय भयानक गर्दी तिथे. खातात-पितात, सिनेमे पाहतात, पोरं गेमबिम खेळतात. चंगळ  नुस्ती.
मॉलचं शहरी अप्रूप जुनं होऊ लागलं तसतसे आता हे मॉल छोट्या, त्याहून छोट्या शहरात उभे राहू लागलेत. त्या मॉलमध्ये एकाच छताखाली काही हजार गोष्टी मिळू लागल्या.
हा उद्योग तसा आपल्याकडे नवाच. त्याला म्हणतात ऑर्गनाईज्ड रीटेल. अजून हे संघटित रीटेल क्षेत्र तसं शहरी परिघापुरतंच र्मयादित असलं तरी आजच्या घडीला या क्षेत्राची उलाढाल ५00 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. देशाच्या एकूण सकल उत्पादनात त्याचा वाटा आहे १४ ते १५ टक्के. मात्र आजही देशाच्या एकूण रीटेल क्षेत्रापैकी ऑर्गनाईज्ड रीटेल क्षेत्र फक्त ४ टक्के आहे. ९६ टक्के रीटेल व्यवसाय आजही असंघटितच आहे.
म्हणजे कल्पना करा जसजसा हा उद्योग वाढेल तसतसे या उद्योगात काम करणारी माणसं वाढतील. रोजगार वाढतीलच. आजच अनेक इंटरनॅशनल ब्रॅण्डस्, अनेक देशी-विदेशी ब्रॅण्डस्च्या भल्यामोठय़ा चेन्स, साखळी दुकानं, त्यात या क्षेत्रात येऊ घातलेली ६0 टक्के विदेशी गुंतवणूक. या सार्‍याचा विचार केला तर येत्या काही काळात सर्वाधिक वेगानं या क्षेत्राचा विस्तार होणं अपेक्षित आहे.
आजच भारतीय रीटेल उद्योग जगातल्या पहिल्या पाच रीटेल उद्योगांपैकी एक आहे आणि तरीही वाढीला मोठा स्कोप आहे, असं म्हटलं तर या उद्योगाचं महाकाय स्वरूप लक्षात यावं.
मॉलमध्ये जातोच आपण, तेव्हा मॉलमध्ये किती प्रकारची माणसं, कुठल्या टप्प्यात काम करतात यावरही एक नजर ठेवली तर तिथल्या कामाच्या संधीही दिसू लागतील.
 
शॉप फ्लोअर एक्झिक्युटिव्ह
 मॉलमधल्या शेकडो दुकानांतल्या काऊन्ण्टर्सवर उभे राहून जी माणसं ग्राहकांना वस्तू दाखवतात, त्याची माहिती देतात, ती विकतात, अत्यंत नम्रपणे अनेक गोष्टी दाखवतात. ते सगळे म्हणजे हे एक्झिक्युटिव्ह. त्याचं त्यासाठी प्रशिक्षण झालेलं असतं. येत्या काळात या एक्झिक्युटिव्हची प्रचंड मागणी असेल आणि कमी शिक्षण असलेल्या मुला-मुलींनाही त्यात मोठी संधी असेल.
 
मर्चण्डायझिंग
मॉलमध्ये लोक घेताहेत वस्तू नी जाताहेत असं होतं हे खरं, पण ज्या वस्तू जास्त विकल्या जाव्यात असं वाटतं, त्या विकण्याची एक स्लो सेलिंगची कला असते. त्या वस्तू मांडायच्या कशा, कुठं, कुणासाठी, त्यातून त्या कशा खपतील, त्या कशा सजवायच्या याचं हे तंत्र, ज्याला र्मचण्डायझिंग म्हणतात. आणि जे हे काम करू शकतील त्यांना म्हणतात मर्चण्डायझर. त्यांचं काम येत्या काळात वाढेल.
 
बॅक स्टोअरवाले
मॉलमधल्या मालाचा एवढा मोठा साठा सांभाळायचा, त्याचा हिशेब ठेवायचा, नवीन माल मागवायचा, मेण्टेन करायचा हे सारं काम पाहण्यासाठीही बॅक स्टोअर स्टाफ मोठय़ा प्रमाणात लागेल. ज्यांच्याकडे संवादकौशल्य कमी आहे, ते सेल्स काऊण्टरवर उभे नाही राहू शकले तरी त्यांना हे काम नक्की जमावं.