शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जाईजुई रातराणीच्या सुगंधी गप्पा

By admin | Updated: October 27, 2016 16:09 IST

जगणं.. ही एक भेट आहे. आपल्या धडधडत्या हृदयानं आपल्याला दिलेली.. येत्या-जात्या श्वासाच्या लयीनं सजवलेली.. ती लय सुंदर आहे.. त्या लयीवर झुलायला लागलं मन की, स्वप्नं पडतात.. ती स्वप्नं सजवा.. त्या स्वप्नांना मेहनतीचे पंख देताना जगा मात्र ‘आज’! भरभरून. आनंदानं. मनसोक्त.

जगणं.. ही एक भेट आहे.  आपल्या धडधडत्या हृदयानं आपल्याला दिलेली.. येत्या-जात्या श्वासाच्या लयीनं सजवलेली.. ती लय सुंदर आहे.. त्या लयीवर झुलायला लागलं मन की,  स्वप्नं पडतात..ती स्वप्नं सजवा..  त्या स्वप्नांना मेहनतीचे पंख देताना जगा मात्र ‘आज’! भरभरून. आनंदानं.मनसोक्त.

स्वप्नांना ‘उद्या’ असतो,आणि श्वासांना फक्त आज..मात्र तो ‘आज’ दिसतो तेवढा छोटा नसतो..त्यासाठी मोजावी लागते प्रेमाच्या कैक क्षणांची किंमत..ती मोजली की, प्रेम बदलून टाकतं जगणं..सामान्य क्षणांना ‘असामान्य’ रूप देतं..तो असामान्य होण्याचा प्रवासआपल्या साऱ्यांचा असतो..आपल्या जगण्यात,वार-तारखांच्या कोरड्या वाटांतअसंख्य दिवे उजळवू लागतो..पण ते दिवे आपल्याला दिसतात का?दिसले तर त्या इटुकल्या चमचमत्या दिव्यांचा चिमुकला पण लख्ख प्रकाश पहा..सावल्या मोजत राहू नका...किरणं मोजा....त्या किरणातली सुंदर चमक पहा..आणि आत दडलेला अंगारही जोखा..कुठं वाटेत दिसली गुलाबाची फुलं..तर काटेच आहेत म्हणून बिचकू नका..गुलाबाच्या स्पर्शासाठी काट्यांचा स्वीकारहीमनापासून करा..मग कुठं मोगरा भेटेल,कुठं रात्री उमललेल्या जाईजुईरातराणीगप्पा मारत बसलेल्या दिसतील..निशिगंधाची सुंदर झुळूक सुखाची सय सांगेल..रात्रीचा काळोख पाहत बसायचा की,या सुगंधी वाऱ्याचा हात धरायचा..हा प्रश्नही मग उरत नाही..अंधाराला आपण डरत नाही..उलट त्या अंधारात लहान मुलं कशा मोजतात चांदण्या..तशा आपण मोजू..ग्रहताऱ्यांपलीकडे जाणाऱ्या वाटा आपण शोधू हे सारं करताना,जगणं साजरं होतं..आणि साजरं करता करताजगणं फुलून येतं..फुलायचं की झुरायचं हा प्रश्नही मग उरत नाहीकारण सुख आणि आपणदोन वेगळे उरत नाही..