शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

केस हायलाइट केले तर?

By admin | Updated: March 26, 2015 20:18 IST

हल्ली हेअर कलर करण्याची खूप फॅशन आहे. तसं पाहता आता खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केस कलर करता येतात; मात्र जो कलर दुसर्‍याच्या केसावर चांगला दिसतो तो आपल्या केसांवर दिसेलच असं नाही.

लीना खांडेकर

 
आपण रोज एक नवीन फॅशन कुठं ना कुठं पाहतो. ते पाहूून आपल्यालाही वाटतं की लूक चेंज करायचं तर आपणही असंच काहीतरी करायला हवं. त्या उत्साहात आपण स्वत:ला हे विचारतच नाही की, आपल्याला हे चांगलं दिसेल का? 
आता हेच पहा ना, हल्ली हेअर कलर करण्याची खूप फॅशन आहे. तसं पाहता आता खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केस कलर करता येतात; मात्र जो कलर दुसर्‍याच्या केसावर चांगला दिसतो तो आपल्या केसांवर दिसेलच असं नाही.
आपण आपला हेअर कलर निवडताना आपल्या त्वचेचा रंग, आपल्या केसांचा पोत, आपली आवड, आपलं काम आणि आपली लाइफस्टाइल यासगळ्याचा विचार करायला हवा.
आणि मुख्य म्हणजे आपल्याला सगळेच केस कलर करायचे आहेत की, फॅशन म्हणून काहीतरी छोटूसं करून पहायचं आहे हेदेखील ठरवा.
त्यासाठी काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि केस कलर करायचा निर्णय घ्याल तेव्हा ही माहिती तपासून घ्या.
१) फॅशन म्हणून केस कलर करायचे असतील तर हायलाइट्स, स्ट्रीप कलर असे प्रकारही करता येतात. त्यातही ब्लॉण्ड, लाल, निळा असे रंग वापरता येतात.
२) ज्यांचे केस पांढरे झालेत आणि ते झाकण्यासाठी जे कलर करतात त्यांनी मात्र जास्त खबरदारी घ्यायला हवी.
३) अमोनिया फ्री असे कलर्स बाजारात मिळतात. ते वापरता येतात पण ज्यात अमोनिया असतो ते रंग जास्त काळ केसांवर टिकतात.
४) जे पांढरे केस झाकण्यसाठी केस कलर करतात त्यांनी एकदा ग्लोबल कलर ही थेरपी करून मग एक ते दीड महिन्यांनी रूट टचअप केलं तरी चालतं.
५) हायलाइट्स किंवा स्टायकिंग केलं तर अशा गोष्टी ८ ते १0 महिने खूप छान राहतात. त्यानंतर मात्र त्यांना रिफ्रेश करावं लागतं. ते केलं नाही तर असे हायलाइट्स डल दिसू लागतात.
६) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलरिंगनंतर योग्य तो एसटी कलर श्ॉम्पू, कंडिशनर, हेअर स्पा हे सारं करणं फार गरजेचं असतं. तरच तुमचे कलर्ड केस चांगले दिसतात.
७)  आपलं व्यक्तिमत्त्व आणि त्याला शोभेल असा रंग हे गणित जर जमलं तर केस कलर केल्यानं तुमचा लूक खरंच बदलू शकतो.