शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कसं ओळखाल की तुमच्या भोवतीची माणसं प्रगतीला तारक आहेत की मारक?

By admin | Updated: April 25, 2017 16:36 IST

आपला स्वभाव, फॅशन, करिअरचे निर्णय हे सारं दोस्तांशी सल्लामसलत करुनच आपण ठरवतो.पण

- नितांत महाजन
 
आपले कॉलेजातले दोस्त. आपली गॅंग. आपला ग्रूप हे सारं आपल्याला जीवाभावाचंच असतं. दोस्त म्हणतील तसं आपण करतो. आपला स्वभाव, आवडीनिवडी, फॅशन, आपलं बोलणं, रुटीन, करिअरचे निर्णय हे सारं दोस्तांशी सल्लामसलत करुनच आपण ठरवतो.
आपल्या घरच्यांपेक्षा हे दोस्तच आपल्याला जवळचे वाटतात. 
मात्र आपण हे कसं ओळखायचं की आपले हे दोस्त आपल्या प्रगतीला तारक आहेत की मारक?
त्याच्या काही टेस्ट लंडन स्थित एका ऑनलाइन पोर्टलने सांगितल्या आहेत.
 
1) डू इट ऑर नॉट पॉसिबल
ही एक साधी टेस्ट या अभ्यासानं अनेकांच्या मित्रांच्या संदर्भात वापरुन पाहिली. म्हणजे काय तर एखादं काम जर मित्र करणार असेल तर दोस्त काय म्हणतात. म्हणजे अगदी पहिली विचारही न करता दिलेली रिअ‍ॅक्शन काय असते?
डू इट! म्हणजे जमेल तुला, क्या बात है, कर तू, आम्ही आहोत ना.
असं म्हणतात
की 
काहीतरीच काय, कसली खुळं येतात तुझ्या डोक्यात, तुझं वय काय तू बोलतोस काय, समजतो कोण स्वतर्‍ला, औकातीत रहा.
नेमकं काय सांगतात.
हे मित्र तुम्हाला?
 
टेस्ट साधी आहे, अत्यंत सोपी.
पण आपल्या मित्रांच्या संदर्भात तिचा विचार करून पहा.
म्हणजे काय जर तुमचे मित्र जर तुम्हाला पहिली रिअ‍ॅक्शन देत असतील तर समजा की ते तुमच्या प्रगतीला पोषक आहेत.
दुसरी देत असतील तर समजा ते घातक आहेत, ते तुमचा उत्साह मारुन टाकतात. तुम्हाला बांधून घालतात.
अशा मित्रांचा हात त्वरित सोडा.