शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

चकाचक - फर्निचर अँण्ड फर्निशिंग्ज

By admin | Updated: May 14, 2014 14:45 IST

‘दिवार’मधला अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा फेमस डायलॉग. विजय - ‘मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है, तुम्हारे पास क्या है? रवि - मेरे पास मॉँ है.

‘दिवार’मधला अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा फेमस डायलॉग. विजय - ‘मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है, तुम्हारे पास क्या है?
रवि - मेरे पास मॉँ है.
हा पिक्चर पाहिला नसेल, पण आजच्च्या शेंबड्या पोरालाही हा डायलॉग पाठ आहे. पिक्चरचं जाऊ द्या, पण भास मारण्यासाठी आजच्या विजयच्या या प्रश्नावर आजचा रवि नक्कीच म्हणेल, ‘मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है और ‘फर्निचर’भी है.
गमतीचं जाऊ द्या, पण फर्निचर इंडस्ट्रीच्या वाढीच्या वेगाचा झपाटा इतका जास्त आहे की, सगळीच क्षेत्रे या इंडस्ट्रीने जणू काबीज केली आहेत. घरापासून तर शाळेपर्यंत आणि ऑफिसपासून तर कंपन्यांपर्यंत प्रत्येकालाच याची गरज पडते. या फर्निचरमध्येही पुन्हा वेगवेगळे प्रकार, लाकडी फर्निचर, स्टील फर्निचर, वास्तू आकर्षक दिसण्यासाठी डेकोरेटिव्ह आयटेम्स. या सार्‍या गोष्टींनी तुमचं ‘स्टेटस’ एकदमच वर जातं. त्यामुळे या सार्‍या गोष्टी आपल्याकडे असाव्यात यासाठी सार्‍यांचाच आटापिटा असतो.
आणखी एक. या क्षेत्रात आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे ‘जुने जाऊ द्या, मरणालागूनी.’ असं इथे झालेलं नाही. म्हणजे ट्रॅडिशनल फर्निचर, ट्रॅडिशनल लूक हवा असणाराही एक वेगळा, उंची वर्ग आहे. लक्झरी लाईफटाईम स्टेटमेन्ट म्हणून त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. जुन्या काळची ती चारपाई, लाकडी कपाटं, झुला, बंगळी, आजोबांची ती लाकडी खुर्ची, लाकडी तख्त (दिवान), राऊंड टेबल. या सार्‍या गोष्टी आजही आहेत, उलट ‘अल्ट्रा मॉडर्न’ म्हणून या ट्रॅडिशनल गोष्टींना एक वैभवी उंची लाभली आहे.
आजच्या घडीलाच भारतीय फर्निचर इंडस्ट्री सुमारे ६0 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीची आहे. त्यातला ६५ टक्के भाग घरगुती मार्केटने व्यापला आहे तर ३५ टक्के भाग वेगवेगळ्या संस्थांनी. पण यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल ३५ टक्के वेगाने ही इंडस्ट्री वाढते आहे. या इंडस्ट्रीमध्ये सर्वसाधारणपणे दोन भाग पडतात. फर्निचर आणि फर्निशिंग. फर्निशिंगमध्ये डेकोरेशन आणि सजावटीचा भाग येतो. यात ६८ टक्के वाटा फर्निचरचा तर ३२ टक्के वाटा सजावटीचा.
ट्रॅडिशनल लूक घ्या, नाहीतर मॉडर्न. लोकांना आपला हेवा वाटावा असं वाटत असेल तर त्या त्या प्रकारचं फर्निचर घरात हवंच. पण या क्षेत्रात आपण स्वत:च असू, तर घरात आणि घराबाहेरही आपलंच ‘राज्य’ असेल हे नक्की.
 
इंटेरिअर डिझायनर
आपल्या वास्तूला आपल्या मनासारखा आणि मॉडर्न, रिच लूक द्यायचा असेल तर त्यासाठी इंटेरिअर डिझायनरला पर्याय नाही. शहरी भागात तर त्यांची मागणी वाढते आहेच, पण ग्रामीण भागही आता मागे राहिलेला नाही.
 
 
फर्निचर डिझायनर/मेकर
फॅशन डिझायनरप्रमाणेच फर्निचर डिझायनर हा प्रकारही प्रचंड लोकप्रिय होतो आहे. वेगवेगळ्या मॉडर्न डिझाईनचे आणि उपयुक्त फर्निचर बनविणे हे कौशल्याचे काम आहे. फर्निचरच्या या आयडिया ज्यांच्याकडे असतील आणि काळाप्रमाणे बदलण्याचं कौशल्य ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी येणार्‍या काळात चांदी ! 
 
 
 फर्निचर सप्लायर
फर्निचर प्रत्येक वेळी स्वत:च तयार केले पाहिजे असे नाही, आज मार्केटमध्ये जागोजागी फर्निचरची जी दुकानं, विक्रेते, मॉल्स आपल्याला दिसतात, त्यातील बहुतांश लोक त्याचं फक्त मार्केटिंग आणि सप्लाय करतात. प्रत्यक्षात हे फर्निचर बनवणारे वेगळेच असतात. फर्निचर सप्लायच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल या क्षेत्रात होते आहे.