शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘ढोल’ बजने लगा - इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड आयटी हार्डवेअर

By admin | Updated: May 14, 2014 14:55 IST

घराघरातल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची यादी करा. जाऊ द्या, आपल्या घरात किती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, हे तरी आपल्याला सांगता येईल की नाही? - यादी करायला बसलं तर इतक्या वस्तू निघतील. तरीही त्यातल्या दोन-चार यादीतून सुटूनच जातील!

घराघरातल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची यादी करा. जाऊ द्या, आपल्या घरात किती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, हे तरी आपल्याला सांगता येईल की नाही? - यादी करायला बसलं तर इतक्या वस्तू निघतील. तरीही त्यातल्या दोन-चार यादीतून सुटूनच जातील!
राहू द्या, फार त्रास करून घेऊ नका. सध्या फक्त मोठमोठय़ा आणि महत्त्वाच्या, म्हणजे ज्यांच्याविना आपलं खरंच अडून बसतं अशा वस्तूंचा विचार करू.
टीव्ही, फ्रीज, एसी, मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, व्हीडीओ गेम्स. आणखी काही नावं घ्यायचीत? डिजिटल कॅमेरा, कॅमकॉर्डर्स, टेलिफोन, रेडिओ, एमपीथ्री प्लेअर्स, व्हीडीओ रेकॉर्डर्स. या सगळ्या गोष्टी ‘इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये मोडतात. या वस्तूंची यादी आणखी कितीही मोठी होऊ शकेल. हे झालं फक्त घरापुरतं. ऑफिस आणि उद्योगांसाठी लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची यादी हातभर लांब होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं हे क्षेत्र किती झपाट्यानं वाढतं आहे याची ढोबळ कल्पना यावी यासाठी हे उदाहरण. आकड्यांतच सांगायचं तर २00९च्या अखेरीस फक्त कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समधली भारतातली उलाढाल साधारण चार अब्ज डॉलर्स होती. (आताच्या हिशेबात त्याला रुपयांत कन्व्हर्ट करा.) २0१४ मध्ये हीच उलाढाल साडेपाच अब्ज डॉलर्स झालेली आहे आणि रोज याचं मार्केट गुणाकार पद्धतीनं वाढतं आहे. जे इलेक्ट्रॉनिक्स मार्केटचं तेच आयटी-इन्म्फर्मेशन टेक्नॉलॉजीचं. मध्यंतरीच्या काळात आयटीचा ढोल जोरात फुटला आणि ‘आयटी’वाले दाणकन खाली आपटले, पण ‘आयटी’चे ढोल पुन्हा जोरात वाजायला लागलेले आहेत आणि घोडंही चौखुर उधळतं आहे, विशेषत: आयटी-हार्डवेअरचं. यातल्या उलाढालीनं शंभर अब्ज डॉलरचा पल्ला कधीच पार केला आहे. त्यामुळे आयटी-हार्डवेअर या क्षेत्रात सध्या अर्मयाद संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी फार ‘हार्डवर्क’चीही गरज नाही. या संधीचा फायदा घ्यायला हवा.
 
इलेक्ट्रॉनिक  टेक्निशिअन
इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या वेगानं तयार होताहेत, त्याच वेगानं या वस्तू तयार करणारे आणि त्यांची दुरुस्ती करणारे कारागीर यांची मागणीही झपाट्यानं वाढते आहे किंबहुना मागणीपेक्षा त्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे टेक्निशिअन्सना सगळीकडून मागणी आहे.
 
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅरिंग
ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात खूपच नवनवीन वस्तू येताहेत. हे मार्केट आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन वस्तू तयार करण्याला अजूनही खूप वाव आहे किंवा आहे त्याच वस्तूंमध्ये व्हॅल्यू अँडिशन करूनही नवीनच वस्तू तयार करण्याचा ट्रेंड सध्या जोर धरतो आहे. यासंदर्भातलं थोडं शिक्षण आणि ‘आयडियाज’ डोक्यात असतील तर खूप काही करता येणं शक्य आहे.
 
सेल्स-सर्व्हिसिंग / आफ्टर सेल्स सपोर्ट
वस्तू तयार करण्याबरोबरच त्या वस्तूची विक्री, विक्रीनंतरची सेवा आणि सर्व्हिसिंग या गोष्टीही अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. किंबहुना अनेक वस्तूंची विक्री त्यावरच अवलंबून असते. उदाहरणादाखल सांगायचं तर ज्या मोबाइल हँडसेटचं सर्व्हिस सेंटर आपल्या गावात, शहरात नाही, तो हॅँडसेट घेणं लोक टाळतात. त्यामुळे आफ्टर सेल्स सर्व्हिस ही गोष्ट कळीची ठरते आहे.