शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातल्या मित्रंनो, सॉरी!!

By admin | Updated: June 11, 2015 14:50 IST

खेडय़ापाडय़ातून आलेले आमचे तरुण मित्रमैत्रिणी दुष्काळापायी होरपळताहेत, आणि त्यांची आमची धड ओळखही नाही, याचीच आता लाज वाटते!

‘खेडय़ापाडय़ात श्रीमंत करिअर’ हा ऑक्सिजनचा अंक वाचला!
आणि वाटलं कुठल्या जगात राहतेय मी, मला तर हे सारं काही माहितीच नाही!
मुळात मला खेडीच माहिती नाहीत, खेडय़ातला भारत माहिती नाही, आणि प्रश्नही माहिती नाहीत.
ते माहिती करून घ्यावेत असं कधी कुणी सांगितलं नाही, कधी वाटलंही नाही!
मी कायमच पुण्यात, एफसी रोडवर. मराठवाडय़ातून आलेले आमचे मित्रमैत्रिणी जेव्हा दुष्काळाबद्दल बोलतात तेव्हा त्याचं काही गम्यही वाटत नाही.
अनेकदा तर काही मित्रंना आम्ही चिडवलंपण की, काय तू तुमच्या गावाकडे एवढा दुष्काळ आणि इथं काय करतोय रूपालीत, जा हंडे वाहायला, पाणी भरायला!
आणि तो मित्रही काहीही युक्तिवाद न करता सारं काही ऐकून हसून सोडून द्यायचा. जसं काही त्यानंही नातंच तोडून टाकलं होतं त्याच्या गावाशी, तिथल्या दुष्काळाशी!
एकदा बोलता बोलता तो म्हणाला, ‘कवटाळून करू काय ती दु:ख! इथं सारी सुखं, सारी चमकधमक आणि तिथं नुस्ता खकाणा. मला कंटाळा आलाय त्या खकाण्याचा आणि त्या रिकाम्या डबडय़ांचा!’
त्यादिवशी त्याचा त्रगाही मला काही कळला नाही!
एकदा मात्र चुकून गमतीत आम्ही त्याचं वडिलांशी सुरू असलेलं बोलणं चोरून ऐकलं!
हा त्यांना कळवळून सांगत होता, नका पाठवू पैसे, मी कायपण करीन, मी काहीतरी करीन सोय, तुम्ही माझी काळजी करू नका.
ओशाळं होऊन आम्ही त्याला विचारलं की नेमकं काय झालंय?
तेव्हा तो सांगत होता, बहिणीच्या लग्नापायी डोक्यावर घेतलेलं कर्ज आहे. यंदा काहीच उत्पन्न नाही, एक गाय होती फक्त, तीही मेली. आता वडिलांकडे रोख पैसा हातात येईल अशी काही सोयच नाही.
काय तोंडानं त्यांना सांगू की मला पैसे पाठवा?’
तो ढसढसा रडला तेव्हा माझ्यासारख्यांना कळलं की दुष्काळ काय असतो? गरिबी काय असते आणि लढाई काय असते?
त्याच काळात तुमचा ग्रामीण उद्योजकतेवरचा अंक वाचला. 
वाटलं, असं काहीतरी खेडय़ापाडय़ात जाऊन आमच्यासारख्याच तरुण मुलांनी करायला हवं!
कसं करायचं नि काय करायचं, हे मला आत्ता माहिती नाही!
मला आज एवढंच माहिती आहे की, माझ्या अवतीभोवती माझे असे काही मित्र आहे ज्यांच्या जगण्यात एकाएकी दुष्काळ पडलाय. आणि ते कोरडेठाक होत चाललेत!
दुर्दैव हेच की, त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये.
 
- मिहिरा गुंजाळ, पुणो