शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

शब्दांच्या पिचवरही झहीरच फास्ट

By admin | Updated: October 16, 2015 00:09 IST

जलदगती गोलंदाजांमध्ये गती असणे गरजेचे नाही. गतीसोबत त्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे, असे मत झहीर खान याने मांडले

महेश चेमटे ल्ल मुंबई जलदगती गोलंदाजांमध्ये गती असणे गरजेचे नाही. गतीसोबत त्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे, असे मत झहीर खान याने मांडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘राम-राम’ ठोकल्यानंतर ‘लोकमत’शी त्याने खास संवाद साधला; तेव्हा तो बोलत होता.भारताने २०११ साली जिंकलेल्या विश्वचषकात त्याचा सिंहाचा वाटा होता. दुखापतींनंतरही मिळवलेला ‘विश्वचषक’ या सर्व गोष्टींवर त्याने टाकलेला दृष्टीक्षेप. तो म्हणाला, प्रत्येक गोष्टीला आज ना उद्या थांबावे लागते. खुप विचार केल्यानंतर मी ठरवले, ‘होय, निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ आहे.’ हा निर्णय घेण्याआधी मी माझ्या कुटूंबियांना विचारले. माझ्या मित्रांचा म्हणजे सचिन तेंडूलकर, अजित आगरकर, आशिष नेहरा यांच्यासह सर्व मित्रांचा सल्ला घेतला. प्रशिक्षकांना जेव्हा सांगितले, मी निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. तेव्हा त्यांनी होकर दर्शविला. त्यांच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी हा निर्णय घेतला.तुर्तास मी, क्रिकेट नंतर काय? याचा विचार केलेला नाही. आगामी आयपीलमध्ये मी खेळताना दिसेल. क्रिकेट वगळता अन्य गोष्टींचा विचार सध्या तरी नाही. भविष्यात क्लबच्या माध्यामातून मी क्रिकेटशी जोडलेला असेल. दुखापतींतून सावरल्यानंतर मी टेनिस बॉलच्या साहाय्याने सरावास सुरुवात केली. कौंटी क्रिकेटमुळे मी यशस्वी पुनरागमन करु शकलो. मला अनेक दिग्गज गोलंदाजांनी सल्ला दिला की, मी रनअप कमी करावा. त्यांच्या सल्ल्यानुसार मी धावण्यात बदल केला. त्यामुळे मला स्वत:वर नियंत्रण मिळवता आले. शिवाय गोलंदाजीही भेदक करता आली. >> श्रीरामपूर ते भारतीय संघ या प्रवासात मी अनेक चांगले-वाईट अनुभव घेतले. एका गावातील मुलगा एक स्वप्न पाहतो, त्याचा पाठलाग करतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणतो, असे काहीसे माझ्याबाबत बोलता येईल. रणजी सामन्याने मला खुप काही दिले. त्यावेळी सुधीर नाईक यांनी दिलेला सल्ला आज ही लक्षात आहे, ते म्हणाले, जहीर क्रिकेटचा गंभीरपण विचार कर. मस्करीत खेळणे वेगळे आणि खेळाची मस्करी करणे यात फरक आहे. त्या सल्ल्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळली.>>भारताने विश्वचषक जिंकला तो दिवस आजही आठवतो. संपुर्ण स्टेडिअम प्रेक्षकांनी भरलेले. त्या आधी मोहालीमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला होता. वानखेडेवर उतरण्यापुर्वी आम्ही संगळ््यांनी आपले सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करायचे असे ठरवले. मैदानात ‘वंदे मातरम’ने वातावरणात भरलेला उत्साह या वातावरणात एक वेगळी उर्जा होती. अंतिम सामन्यासाठी कोणता दबाव नव्हता हे जरी खरे असले तरी आम्ही पुर्णपणे विश्रांती ही घेऊ शकत नव्हतो. अखेर तो क्षण आला आणि आम्ही विश्वचषकावर नाव कोरले.