दुखापतीमुळे युवराज स्पर्धेबाहेर

By Admin | Updated: March 31, 2016 03:10 IST2016-03-31T03:10:24+5:302016-03-31T03:10:24+5:30

टी२० विश्वचषकसाठी उपांत्य फेरीच्या तयारीपुर्वीच टीम इंडियाला युवराज सिंगच्या दुखापतीचा मोठा धक्का बसला आहे. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे युवराज स्पर्धेबाहेर गेल्याने भारता

Yuvraj out of injury due to injury | दुखापतीमुळे युवराज स्पर्धेबाहेर

दुखापतीमुळे युवराज स्पर्धेबाहेर

मुंबई : टी२० विश्वचषकसाठी उपांत्य फेरीच्या तयारीपुर्वीच टीम इंडियाला युवराज सिंगच्या दुखापतीचा मोठा धक्का बसला आहे. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे युवराज स्पर्धेबाहेर गेल्याने भारतासमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे आता त्याच्या जागी मनिष पांडेचा समावेश करण्यात आला आहे.
मोहाली येथे आॅस्टे्रलियाविरुध्द खेळतान युवराजच्या टाचेला दुखापत झाली. यानंतर त्याला खेळताना प्रचंड वेदनाही झाला. त्यामुळेच तपासणीनंतर त्याला पुढे खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तांत्रिक समितीने भारताला युवराजच्या जागी पांडेला खेळविण्याची परवानगी एका निवेदनाद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे संपुर्ण स्पर्धेत राखीव खेळाडूंमध्ये राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या ऐवजी पांडेला बोलाविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वानखेडेवर उपांत्य सामना होत असताना मुंबईकर रहाणेच्या अनुभवाचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो, अशी चर्चा रंगत असताना अंतिम एकादशमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Yuvraj out of injury due to injury