युनूसचे द्विशतक, ऑसी अडचणीत

By Admin | Updated: November 1, 2014 00:41 IST2014-11-01T00:41:08+5:302014-11-01T00:41:08+5:30

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुस:या कसोटी सामन्यात दुस:या दिवशी पहिला डाव 6 बाद 57क् धावांवर घोषित केला.

Yunus's Twenty20, Aussie Trouble | युनूसचे द्विशतक, ऑसी अडचणीत

युनूसचे द्विशतक, ऑसी अडचणीत

अबुधाबी : फॉर्मात असलेल्या युनूस खानच्या (213 धावा, 349 चेंडू, 15 चौकार, 2 षटकार) द्विशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुस:या कसोटी सामन्यात दुस:या दिवशी पहिला डाव 6 बाद 57क् धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळणा:या ऑस्ट्रेलियाची दिवसअखेर पहिल्या डावात 1 बाद 22 अशी अवस्था झाली आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी 16 धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या डेव्हिड वॉर्नर याला नाईट वॉचमन नॅथन लियोन (क्1) साथ देत होता.  ऑस्ट्रेलिया अद्याप पहिल्या डावात 548 धावांनी पिछाडीवर आहे.

 

Web Title: Yunus's Twenty20, Aussie Trouble