शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

योगेश्वरकडून देशवासीयांना सुवर्णनिरोपाची अपेक्षा

By admin | Updated: August 21, 2016 08:09 IST

एकीकडे महिला कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कांस्यपदकाचा आनंद, तर दुसरीकडे नरसिंग यादववर घालण्यात आलेल्या बंदीचे दु:ख या पार्श्वभूमीवर योगेश्वर दत्त रिओ आॅलिम्पिकच्या

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. २१ : एकीकडे महिला कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कांस्यपदकाचा आनंद, तर दुसरीकडे नरसिंग यादववर घालण्यात आलेल्या बंदीचे दु:ख या पार्श्वभूमीवर योगेश्वर दत्त रिओ आॅलिम्पिकच्या रविवारी शेवटच्या दिवशी भारताला सुवर्णनिरोप देण्याच्या इराद्याने उतरेल, अशी देशवासीयांना अपेक्षा आहे. भारताने आतापर्यंत रिओ आॅलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले आहे. भारताकडे आता योगेश्वरच्या रूपाने पदकाची शेवटची आशा शिल्लक आहे.

स्पर्धेच्या अंतिम दिवशी ६५ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाईल प्रकारात योगेश्वर पदकाच्या अपेक्षेने उतरणार आहे. आॅलिम्पिकला जाण्यापूर्वी योगेश्वरने आपण सुवर्णपदकाने कारकिर्दीची सांगता करणार असल्याचे म्हटले होते.

भारताने रिओ आॅलिम्पिकमध्ये आठ पैलवानांचा चमू उतरवला होता. यामध्ये साक्षी मलिकने अनपेक्षित कामगिरी करीत कांस्यपदक मिळविले. परंतु सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला नरसिंग यादव डोप टेस्टमध्ये अडकल्यामुळे देशाला नरसिंगच्या धक्क्यातून सावरण्याची आणि पदक मिळवून देण्याची जबाबदारी आता योगेश्वरवर आली आहे.

योगेश्वरने जर पदक जिंकले तर तो दोन आॅलिम्पिक पदके जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू बनेल. आतापर्यंत हा पराक्रम फक्त सुशीलकुमारनेच केला आहे. साक्षी आणि सिंधूच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशवासीयांच्या नजरा आता योगेश्वरच्या सुवर्णनिरोपाकडे लागल्या आहेत. लंडन आॅलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तने कांस्यपदक पटकावले होते.