शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक भारत जिंकेल

By admin | Updated: November 22, 2014 02:04 IST

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनी आज, शुक्रवारी भारतीय संघाला आगामी आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनी आज, शुक्रवारी भारतीय संघाला आगामी आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आणि ‘२०१५चा विश्वचषक’ भारतीय संघच जिंकेल, अशी आशा व्यक्त केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २०१३-१४ च्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण आज मुंबईत करण्यात आले. यावेळी वेंगसरकर यांना भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेंगसरकर म्हणाले, आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला घवघवीत यश मिळेल, यासाठी माझ्या शुभेच्छा. आशा करतो की, या मालिकेच्या अनुभवाच्या बळावर भारत विश्वचषकाचे जेतेपद कायम राखण्यात यशस्वी होईल.५८ वर्षीय वेंगसरकरांनी ११६ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७५-७६ मध्ये नागपूर येथे इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या वेंगसरकर यांनी शेष भारताविरुद्ध खणखणीत शतक ठोकले होते. १९८३च्या विश्वचषक विजयी आणि १९८५च्या चॅम्पियन्स चषक विजयी संघात त्यांचा समावेश होता. तसेच २००६ ते २००८ या कालावधीत त्यांनी भारताच्या वरिष्ठ संघाच्या निवड समिती अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर वेंगसरकर म्हणाले, या आनंदाच्या क्षणी माझ्या शाळेचे किंग जॉर्ज (राजे शिवाजी) ज्यांच्याकडून मी पहिल्यांदा ‘गाईल्स आणि हॅरिस’ शिल्ड स्पर्धेत खेळलो त्यांचे आभार व्यक्त करतो. पोद्दार कॉलेजचे विशेष आभार. त्यांच्यामुळे भारतीय संघाचे आणि भारतीय विद्यापीठ संघाचे कर्णधारपद भूषविण्याची मला संधी मिळाली. विद्यापीठाच्या संघाकडून १९७७ मध्ये एमसीसी संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळाला. तसेच दादर युनियन क्लबला विसरून चालणार नाही. मुंबई आणि भारतीय संघाकडून खेळतानाच्या अनेक आठवणी या क्लबशी जोडलेल्या आहेत.मुंबई आणि भारतीय संघात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि हे दोन्ही पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक डाव, प्रत्येक सामना, प्रत्येक मालिका आणि प्रत्येक दौऱ्याचा मनमुरादपणे आनंद लुटल्याचे वेंगसरकर सांगतात. (प्रतिनिधी)