शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

कुजबूज--सद्गुरू, 12 सप्टेंबर

By admin | Updated: September 13, 2014 00:01 IST

म्हणे रिपोर्ट कार्ड

म्हणे रिपोर्ट कार्ड
मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे मंत्र्यांच्या प्रगतीचा आढावा घेतात, असे सांगितले जाते. पत्रकारांनी विचारले की, दरवेळी मुख्यमंत्री एकच सांगतात की, मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतोय. प्रत्यक्षात ते खरोखर प्रगतीचा आढावा घेत आहेत काय? काही मंत्र्यांशी पत्रकार जेव्हा याविषयी खासगीत बोलतात तेव्हा मंत्री सांगतात की तसे काहीही सुरू नाही. मुख्यमंत्री मंत्र्यांना त्यांच्या कामाविषयी काही विचारत नाहीत आणि विचारायला गेले तर मंत्री मांद्रेकर वगैरेंना राग येतो. अगोदर प्रशासनाची गाडी मुख्यमंत्र्यांनी नीट करावी व मग आमच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, असे एक मंत्री विनोदाने नमूद करतात. मुख्यमंत्री मंत्र्यांचे रिपोर्ट कार्डही तयार करणार नाहीत आणि मंत्रिमंडळातून कुणाला वगळणारही नाहीत, असे काहीजण सांगतात. आमदार पाशेको मात्र एका मंत्र्याला निश्चितच र्पीकर वगळतील व तिथे आपली वर्णी लावतील, असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात. तूर्त भाजपच्या आमदारांहूनही र्पीकरांवर थोडा जास्त विश्वास मिकींचा आहे. सगळ्य़ा प्रकरणांमधून आपण सुटेन, असे त्यांना वाटते.
..............
बिचार्‍या बँका
राज्यातील काही सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका सध्या कावर्‍याबावर्‍या झाल्या आहेत. आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे ऐकावे की सरकारचे ऐकावे तेच त्यांना कळत नाही. सरकारने जी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे, त्या योजनेच्या अनुषंगाने बँकांनी एकरकमी कर्जफेड योजना राबवावी व व्याज वगैरे खाण अवलंबितांना माफ करावे, असे सरकारला वाटते. सरकार चारशे कोटी रुपये खर्च करणार आहे. यात खाणमालकांचा एकही पैसा नसेल. सगळे पैसे कर भरणा करणार्‍या सर्वसामान्य गोमंतकीयांचे आहेत. रिझर्व्ह बँकेची मान्यता नसताना आम्ही सरसकट सर्वांना व्याजमाफी देऊ शकत नाही, असे अनेक बँकांचे अधिकारी सांगतात. सरकारला तसे स्पष्ट सांगण्याचे धाडस सहकारी संस्था व बँकांना होत नाही. सरकार म्हणते की, आरबीआयला काही लागत नाही. मग आतापर्यंत सरकार प्रमुख मुंबईला वगैरे जाऊन आरबीआयच्या अधिकार्‍यांशी बैठका का घेत होते? सहकारी बँकांना आमसभा बोलावून ओटीएस योजनेस मान्यता घ्यावी लागेल.