शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

...तर निवृत्ती जाहीर करणार !

By admin | Updated: June 17, 2016 05:31 IST

रिओ आॅलिम्पिकसाठी निवड न झाल्यास, माझ्यासमोर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे स्पष्ट मत आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोमने मांडले.

मेरी कोम : बॉक्सर्स तयार करणार- महेश चेमटे,  मुंबई .आजही मी तिरंगा खांद्यावर घेऊन रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी उत्सुक असून, वाइल्ड कार्डसाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे. मात्र रिओ आॅलिम्पिकसाठी निवड न झाल्यास, माझ्यासमोर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे स्पष्ट मत आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोमने मांडले.मुंबईतील अंधेरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात मेरीने ‘लोकमत’शी संवाद साधला. या वेळी तिने भारतीय बॉक्सिंग महासंघाचा वाद, रिओ आॅलिम्पिक अशा विषयांवर आपले मत मांडले. ‘‘जागतिक स्पर्धेत मी दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली. मी पूर्ण ताकदीने खेळली होती आणि माझा खेळही चांगला झाला होता. माझ्या कामगिरीवर मी संतुष्ट होती, मात्र खेळात हार-जीत होते. खेळाडू म्हणून पंचाच्या निर्णयाचा मला आदर आहे. त्या पराभवामुळे मी निराश झाले असली, तरी एकूण कामगिरीवर मी समाधानी आहे,’’ असे मेरीने सांगितले.सध्या वादात अडकलेल्या भारतीय बॉक्सिंग संघटनेविषयी मेरी म्हणाली, ‘‘भारतीय संघटनेला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. खेळाची संघटना ही त्या खेळाचे कुटुंब असते. नेमकी तीच कमतरता संघटनेमध्ये आहे. याचा खेळावर आणि खेळाडूंवर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे वेळीच योग्य ते बदल झाले पाहिजेत.’’ तसेच, रिओ आॅलिम्पिकसाठी शिवा थापा या एकमेव भारतीय बॉक्सरने पात्रता मिळवली असून, त्याला माझ्याकडून शुभेच्छा आहे. मीही देवाकडे माझ्या वाइल्ड कार्डसाठी प्रार्थना करीत असून, ही संधी मिळाल्यास पुन्हा एकदा मी भारतासाठी नक्कीच अभिमानस्पद कामगिरी करेन, असा विश्वासही मेरीने या वेळी व्यक्त केला. ‘‘भारतीय आॅलिम्पिक संघटना माझ्या वाईल्ड कार्डसाठी सातत्याने पाठपुरावा करत असून, मी त्यांची ऋणी आहे. नेहमीप्रमाणे माझा खडतर सराव सुरू असून, आॅलिम्पिक प्रवेश मिळेल की नाही, ही भीती कायम मनात असते. परिणामी सध्या मी द्विधा मनस्थितीत अडकली आहे,’’ असेही मेरी म्हणाली.देशात जास्तीत जास्त तरुणांनी बॉक्सिंगमध्ये यश मिळवावे, त्यासाठी मी बॉक्सिंग अकादमी सुरू करणार असून, युवांना बॉक्सिंगचे धडे देण्यात येतील. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही त्याच ठिकाणी करण्यात येईल. तूर्तास तरी माझे संपूर्ण लक्ष आॅलिम्पिकच्या प्रवेशाकडे आहे.- मेरी कोम