शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिजचा ‘आॅसी’ला दणका

By admin | Updated: June 15, 2016 05:16 IST

मार्लेन सॅम्युअल्सने झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिरंगी एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत जगज्जेत्या आॅस्टे्रलियाला ४ विकेट्सने लोळवले.

सेंट कीट्स : मार्लेन सॅम्युअल्सने झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिरंगी एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत जगज्जेत्या आॅस्टे्रलियाला ४ विकेट्सने लोळवले. आॅस्टे्रलियाने दिलेल्या २६६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ६ फलंदाजांच्या मोबदल्यात ४५.४ षटकांतच विजयी लक्ष्य पार केले. वॉर्नर पार्क येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडीजने आॅसी संघाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. आॅसीने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २६५ धावांची समाधानकारक मजल मारली. यानंतर आक्रमक सुरुवात केलेल्या विंडीजला रोखण्यात अपयशी ठरल्याने आॅसीला पराभवास सामोरे जावे लागले.धावांचा पाठलाग करताना जॉन्सन चार्ल्स (४८) आणि आंद्रे फ्लेचर (२७) यांनी ७४ धावांची सलामी देत विंडीजला आक्रमक सुरुवात करून दिली. दोन्ही सलामीवीर ४ षटकांच्या अंतराने बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव २ बाद ८५ असा घसरला. मात्र ड्वेन ब्रावो (३९) आणि सॅम्युअल्स (९२) यांनी संघाला सावरले. या दोघांनी ८२ धावांची भागीदारी केली. ब्रावो बाद झाल्यानंतर सॅम्युअल्सने खिंड लढवताना शानदार अर्धशतक झळकावताना संघाला विजयी मार्गावर आणले. सॅम्युअल्सने ८७ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ९२ धावा फटकावल्या. दिनेश रामदिन (२९) आणि केरॉन पोलार्ड (नाबाद १६) यांनी छोटेखानी फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्का मारला. अ‍ॅडम झम्पा आणि नॅथन कुल्टर-नाइल यांनी प्रत्येकी २ बळी घेत विंडीजला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. जेम्स फॉल्कनरने एक बळी घेतला.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर उस्मान ख्वाजा, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जॉर्ज बेली या त्रयीने झळकावलेल्या अर्धशतकच्या जोरावर आॅसीने अडीचशेचा पल्ला पार केला. ख्वाजाचे शतक केवळ २ धावांनी हुकले. त्याने १२३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ९८ धावा फटकावल्या. स्मिथने ९५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ७४ धावा केल्या. तर बेलीने ५६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांचे योगदान दिले. जेसन होल्डर, कार्लोस ब्रेथवेट आणि केरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी २ बळी घेत आॅसी संघाच्या धावफलकाला ब्रेक मारला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :आॅस्टे्रलिया : ५० षटकांत ७ बाद २६५ धावा (उस्मान ख्वाजा ९८, स्टीव्ह स्मिथ ७४, जॉर्ज बेली ५५; केरॉन पोलार्ड २/३२, जेसन होल्डर २/४४, कार्लोस ब्रेथवेट २/६०) पराभूत वि. वेस्ट इंडिज (मार्लेन सॅम्युअल्स ९२, जॉन्सन चार्ल्स ४८; अ‍ॅडम झ्म्पा २/६०, नॅथल कुल्टर-नाइल २/६७)