वेस्ट इंडीज मंडळाला त्या शिफारशी मान्य

By Admin | Updated: January 16, 2015 03:55 IST2015-01-16T03:55:51+5:302015-01-16T03:55:51+5:30

वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी आॅक्टोबर २०१४ मध्ये भारत दौरा रद्द केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने (डब्ल्यूआयसीबी) नेमलेल्या समितीच्या शिफारशी मान्य केल्या आहेत़

The West Indies Board approves the recommendations | वेस्ट इंडीज मंडळाला त्या शिफारशी मान्य

वेस्ट इंडीज मंडळाला त्या शिफारशी मान्य

अँटिग्वा : वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी आॅक्टोबर २०१४ मध्ये भारत दौरा रद्द केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने (डब्ल्यूआयसीबी) नेमलेल्या समितीच्या शिफारशी मान्य केल्या आहेत़
डब्ल्यूआयसीबीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संघ एकजूट होऊन खेळावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे़ तसेच, या दौऱ्यात संघातील खेळाडूंची कामगिरी खराब झाल्यास त्याची संपूर्ण जबादारी ही प्रशिक्षकाची राहील़ या समितीने सुचविलेल्या समितीनुसार कोणतीही सिरीज सुरू होण्याच्या कमीत कमी तीन आठवड्यांपूर्वी खेळाडूंना त्या दौऱ्यासाठी करार काय असेल, याची माहिती देणे बंधणकारक राहील़ त्याचबरोबर खेळाडू मानसिकरीत्या सुदृढ होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल़

Web Title: The West Indies Board approves the recommendations