शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

विकास चौथ्या, शिवा सातव्या स्थानी

By admin | Updated: December 24, 2016 01:04 IST

आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्ण विजेता विकास कृष्ण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या (एआयबीए) जाहीर झालेल्या

नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्ण विजेता विकास कृष्ण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या (एआयबीए) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानी आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य विजेती साविती बुरा दुसऱ्या स्थानी आहे.
एआयबीए व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये वर्षांतील सर्वोत्तम बॉक्सर ठरलेल्या विकासने ७५ किलो वजनी गटात १३५० मानांकन गुणांची कमाई केली आहे. विकासने रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.
पुरुष बॉक्सिंगमध्ये शिवा थापा ५६ किलो गटात सातव्या स्थानी आहे. माजी आशियाई चॅम्पियन व विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता शिवाने अलीकडेच लाइटवेट ६० किलो वजनी गटात सहभागी होण्यास प्रारंभ केला आहे. भारताचा एल देवेंद्रो सिंग लाईट फ्लायवेट (४९ किलो) गटात २७ व्या स्थानी आहे, पण शिवाप्रमाणे तोसुद्धा आता ५२ किलो वजन गटात सहभागी होत आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमार लाईट वेल्टरवेट (६४ किलो) गटात ३६व्या स्थानी आहे. आता तो वेल्टरवेट (६९ किलो) गटात सहभागी होणार आहे. महिला बॉक्सरमध्ये साविती (८१ किलो) १५०० मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. सरजूबाला देवी लाईट फ्लायवेट गटात (४८ किलो) तिसऱ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)