शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजय नवनाथ उपांत्य फेरीत

By admin | Updated: May 16, 2016 05:01 IST

दोन्ही मुंबई शहराच्या संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना विजय क्लबच्या वतीने सुरू असलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली

मुंबई : विजय नवनाथ आणि साउथ केनरा या दोन्ही मुंबई शहराच्या संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना विजय क्लबच्या वतीने सुरू असलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याच वेळी महाराष्ट्र रहाटणी (पुणे) आणि शिवशंकर (कल्याण -ठाणे) यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश करताना चमक दाखवली. शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात, विजय नवनाथने बाजी मारताना ओम साई संघाचा २४-४ असा फडशा पाडला. मध्यंतराला विजय संघाने सावध भूमिका घेत ६-३ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मात्र, जबरदस्त वेगवान खेळ करताना ओम साईला प्रतिकाराची एकही संधी न देता दिमाखात उपांत्य फेरी गाठली. सागर कुरहाडे, अमित चव्हाण यांच्या खोलवर चढाया व संजय राणे, योगेश सुर्वे यांच्या दमदार पकडी विजय नवनाथसाठी निर्णायक ठरल्या. साउथ केनरानेही दमदार बाजी मारताना कसलेल्या एच. जी. एस.चे कडवे आव्हान २४-१३ असे परतावले. सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ करताना साउथ केनराने एचजीएसवर लोण देताना मध्यंतराला १३-६ असे वर्चस्व राखले. यानंतर, मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम ठेवताना केनराने विजयी कूच केली. कोकिला शेट्टीच्या जबरदस्त पकडी आणि गौरव शेट्टी, हर्षित यांच्या आक्रमक चढाईच्या जोरावर केनराने विजय मिळवला. दुसऱ्या बाजूला प्रदीप गिरी, चेतन थोरात यांनी केलेल्या खोलवर चढायांच्या जोरावर महाराष्ट्र राहाटणीने दमदार आगेकूच करताना अंकुरचा कडवा प्रतिकार १७-९ असा मोडला. मध्यंतराला सामना ३-३ असा बरोबरीत राहिल्यानंतर वेगवान खेळ करताना महाराष्ट्र रहाटणीने उपांत्य फेरी निश्चित केली. गणेश ठेरंगे, अमोल नरकते यांनी मजबूत पकडी करत अंकुरच्या आक्रमणातील हवा काढली. तर अन्य लढतीत शिवशंकरने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करताना यंग प्रभादेवीला १४-९ सहज नमवले. मध्यंतराला ९-७ अशी आघाडी राखल्यानंतर शिवशंकरने आक्रमक खेळ केला. (क्रीडा प्रतिनिधी)